राष्ट्रवादीला मोठा धक्का! कुडाळमधील १०० पेक्षा अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 05:34 PM2021-02-25T17:34:53+5:302021-02-25T17:37:44+5:30

उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये असलेल्या भुसावळ नगरपालिकेतील भाजप नगराध्यक्ष आणि १३ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर तळकोकणातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

ncp volunteers from kudal and malvan joins bjp | राष्ट्रवादीला मोठा धक्का! कुडाळमधील १०० पेक्षा अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीला मोठा धक्का! कुडाळमधील १०० पेक्षा अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Next
ठळक मुद्देकुडाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्कानारायण राणे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रमनितेश राणे यांच्यासह भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित

सिंधुदुर्ग : उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये असलेल्या भुसावळ नगरपालिकेतील भाजप नगराध्यक्ष आणि १३ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर तळकोकणातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. (ncp volunteers from kudal and malvan joins bjp)

कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. कुडाळ मालवण बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सचिन तेंडुलकर आणि संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घड्याळ सोडून कमळ हाती धरले आहे. 

रांगेतील घुसखोरी शिवसेनेची आपमतलबी राजकीय संस्कृती दाखवणारी; भाजप नेत्याची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नितेश राणे यांच्यासह भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.

कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळे कुडाळ पंचायत समितीत भाजपची सत्ता आली होती. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात पर्यायाने शिवसेनेला धक्का देत राणे यांनी कुडाळच्या सभापतींना भाजपमध्ये आणले होते. 

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात दबदबा असलेल्या एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजप नगराध्यक्षासह १३ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

Web Title: ncp volunteers from kudal and malvan joins bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.