"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 03:19 PM2022-07-11T15:19:50+5:302022-07-11T15:22:18+5:30

Jayant Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे. 

NCP will field 27% OBC candidates in local body elections says jayant Patil | "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार"

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार"

Next

मुंबई  - ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे. 

ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी अगोदरच जाहीर केले आहे.


 

Web Title: NCP will field 27% OBC candidates in local body elections says jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.