राष्ट्रवादीचे ‘कॅम्पस कॉर्नर’

By admin | Published: August 8, 2014 01:34 AM2014-08-08T01:34:30+5:302014-08-08T01:34:30+5:30

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कॅम्पस कॉर्नर - विद्यार्थी जाणिवा जागर या अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गुरुवारी प्रारंभ करण्यात आला.

NCP's Campus Corner | राष्ट्रवादीचे ‘कॅम्पस कॉर्नर’

राष्ट्रवादीचे ‘कॅम्पस कॉर्नर’

Next
>मुंबई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कॅम्पस कॉर्नर - विद्यार्थी जाणिवा जागर या अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस भवनात अभियानाच्या पोस्टर प्रदर्शनाची पवार यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे, राज्यभरात एकाच वेळी 15 ठिकाणी  विविध मान्यवरांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. 
 राजकीय जागृती व  राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तसेच राज्य शासनाने विद्याथ्र्यासाठी केलेल्या विविध योजनांची माहिती तरुणांमध्ये घेऊन जाणारा हा अत्यंत स्तुत्य उपक्र म असून युवा पिढीला राज्यातील राजकीय परिस्थिती याच्या माध्यमातून समजेल, असे अजित पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत, आमदार हेमंत टकले, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदी उपस्थित होते. 
विद्याथ्र्यामध्ये राजकीय, सामाजिक जागृती करून त्यांचे हक्क, अधिकाराबाबत आग्रही भूमिका घेण्यास तयार करणो, तसेच लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीचे महत्व सांगणो हा या अभियाना मागील उद्देश आहे. या अभियानातंर्गत पथनाटय़ाचे सादरीकरण, फ्लॅश मॉब, पोस्टर प्रदर्शन आणि महाविद्यालयीन विद्याथ्र्यासोबत कॉर्नर मिटिंग केल्या जाणार आहेत, अशी माहिती नीलेश राऊत यांनी दिली.
2क्-2क् विद्याथ्र्याच्या 15 टीम महाराष्ट्राच्या कानाकोप:यात जाऊन हा उपक्र म राबविणार असून स्थानिक महाविद्यालयातील राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते संबंधित टीमला मदत करणार आहेत. जवळपास 6क्क् विद्यार्थी मिळून महाराष्ट्राच्या 14क् विधानसभा मतदारसंघात हे अभियान चालवले जाणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कॅम्पस कॉर्नरच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते.
 
च् विद्याथ्र्यामध्ये राजकीय, सामाजिक जागृती करून त्यांचे हक्क, अधिकाराबाबत आग्रही भूमिका घेण्यास तयार करणो, तसेच लोकशाहीतील लोकप्रतिनिधीचे महत्व सांगणो हा या अभियाना मागील उद्देश आहे. 
च्या अभियानातंर्गत पथनाटय़ाचे सादरीकरण, फ्लॅश मॉब, पोस्टर प्रदर्शन आणि महाविद्यालयीन विद्याथ्र्यासोबत कॉर्नर मिटिंग केल्या जाणार आहेत, अशी माहिती नीलेश राऊत यांनी दिली.

Web Title: NCP's Campus Corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.