राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पाटील यांच्या मुलाला मारहाण

By admin | Published: July 28, 2014 01:34 AM2014-07-28T01:34:22+5:302014-07-28T01:34:22+5:30

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजय पाटील यांचा मुलगा शुभंकर पाटील याला मारहाण झाल्याची घटना रविवारी घडली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाजवळ सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

NCP's city president assaulted Patil's son | राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पाटील यांच्या मुलाला मारहाण

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पाटील यांच्या मुलाला मारहाण

Next

पाटील-आर्य यांच्यात जुंपली : पोलिसांत तक्रार दाखल
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजय पाटील यांचा मुलगा शुभंकर पाटील याला मारहाण झाल्याची घटना रविवारी घडली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाजवळ सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.
रविवारी देशपांडे सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
हा मेळावा संपल्यानंतर शुभंकर पाटील सभागृहातून बाहेर पडला असता अचानक काही तरुणांनी त्याच्याशी वाद सुरू केला व शैलेंद्र तिवारी नावाच्या तरुणाने त्याला मारहाण केली. सोबतच जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. यानंतर उपस्थितांनी मध्यस्थी केल्यानंतर तरुण पळून गेले.
शुभंकर पाटील याने दिलेल्या तक्रारीवरुन सीताबर्डी पोलीस ठाण्यात कलम ३२३,५०६ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
माझ्या मुलाला मारहाण करण्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील यांनी केला आहे. विरोधी गटाचे हे षड्यंत्र होते व यामागे आर्य हेच आहेत असे पाटील म्हणाले. तर वेदप्रकाश आर्य यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. अजय पाटील यांनी चुकीचे आरोप केले असून त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: NCP's city president assaulted Patil's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.