राष्ट्रवादी काँग्रेसचा आता तीन मतदारसंघावर दावा

By Admin | Published: June 7, 2014 10:32 PM2014-06-07T22:32:45+5:302014-06-08T00:05:17+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्‘ातील मूर्तिजापूर या हक्काच्या विधानसभा मतदारसंघासह आता आकोट आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघावरही दावा केला आहे.

NCP's claim to three constituencies | राष्ट्रवादी काँग्रेसचा आता तीन मतदारसंघावर दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचा आता तीन मतदारसंघावर दावा

googlenewsNext

अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्‘ातील मूर्तिजापूर या हक्काच्या विधानसभा मतदारसंघासह आता आकोट आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघावरही दावा केला आहे. शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये जिल्‘ातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी हा प्रस्ताव ठेवला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी शरद पवार यांनी जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांची शनिवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीला महानगर आणि ग्रामीण कार्यकारिणीचे पदाधिकार्‍यांसोबतच युवक आघाडीचे पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्‘ात कोणत्या पक्षाचे बळ आहे, सध्या राष्ट्रवादी लढवित असलेल्या जागांव्यतिरिक्त आणखी कुठे जागा वाढवून घेता येईल, पक्ष बांधणीच्या दृष्टिकोणातून कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, या सर्व बाबींवर सांगोपांग चर्चा झाली. मूर्तिजापूर या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघासोबत पक्षाचे प्राबल्य आकोट आणि अकोला पूर्व मतदारसंघात असल्याचा दावा उपस्थित पदाधिकार्‍यांनी केला. काँग्रेसला या मतदारसंघातून केवळ राष्ट्रवादीमुळे आघाडी मिळत असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगून या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, महानगर अध्यक्ष अजय तापडिया, डॉ. संतोष कोरपे, माजी आमदार तुकाराम बिरकड, महानगराचे कार्याध्यक्ष सरफराज खान, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रतिभा अवचार, राजीव बोचे, वासुदेव बोळे, युवक आघाडीचे सचिन वाकोडे, नितीन झापर्डे, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सिमांत तायडे, आतिष महाजन यांच्यासह सर्व तालुका प्रमुख आणि जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. 

** निमंत्रणच नाही
मुंबई आयोजित राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी जिल्‘ातील पदाधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले होते. शहर आणि ग्रामीणच्या अध्यक्षांसोबतच काही प्रमुख पदाधिकार्‍यांना पक्षाकडून थेट निमंत्रण मिळाले. या पदाधिकार्‍यांनी कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकारी व जिल्‘ातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र, कुणालाही निमंत्रण देण्यात आले नाही. त्यानंतरही जिल्‘ातून ३५ पेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: NCP's claim to three constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.