राष्ट्रवादीची भिस्त आघाडीवर
By admin | Published: February 24, 2017 04:39 AM2017-02-24T04:39:27+5:302017-02-24T04:39:27+5:30
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी जिल्हा परिषदेत सत्ता
सोलापूर : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी पक्षाची संपूर्ण भिस्त समविचारी पक्षांच्या आघाडीवर असणार आहे. काँग्रेस, शेकाप आणि स्थानिक आघाड्यांना सोबत घेतले तरच राष्ट्रवादी पक्षाला सत्ता स्थापन करता येईल. गेल्या निवडणुकीत खातेही न उघडलेल्या भाजपाने यावेळी १५ जागा मिळविल्या आहेत. ११ पैकी ६ पंचायत समित्यांवर भाजप-शिवसेनेने विजय मिळविला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत गेल्या १८ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. यंदा प्रथमच पक्षातील तरुण फळीने भाजपा आणि शिवसेनेच्या मदतीने प्रत्येक तालुक्यातील नाराज कार्यकर्त्यांना एकत्र करून महाआघाडी केली होती. या आघाडीला अंशत: यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा पटकाविल्या आहेत तर सांगोला तालुक्यात शेकापबरोबर आघाडी करून ५, मंगळवेढ्यात १, पंढरपुरात २ आणि काँग्रेसच्या एकूण सहा जागा मिळून राष्ट्रवादी ३४ चा जादुई आकडा पार करू शकते. गेल्या निवडणुकीत पिछाडीवर गेलेल्या विजयसिंह मोहिते-पाटलांंनी यावेळी माशिरस तालुक्यात ११ पैकी ८ जिल्हा परिषद गटावर विजय मिळवून पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपाने १५ जागांवर विजय मिळविला आहे. गेल्या निवडणुकीत नामोनिशान नसलेल्या भाजपला यावेळी १५ जागा मिळाल्याने सत्तेच्या शर्यतीत उतरण्याची या पक्षाला संधी आहे.
सोलापूर
पक्षजागा
भाजपा१५
शिवसेना0६
काँग्रेस0७
राष्ट्रवादी२७
इतर१३