दत्तक धोरणावर राष्ट्रवादीची टीका

By admin | Published: January 15, 2016 01:44 AM2016-01-15T01:44:42+5:302016-01-15T01:44:42+5:30

मुंबईतील मोकळ्या जागा आणि मैदाने खाजगी तत्त्वावर दत्तक देण्याबाबत सुधार समितीत झालेला निर्णय म्हणजे, मुंबईतील उरल्या सुरल्या जागा गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा

NCP's criticism on adoption policy | दत्तक धोरणावर राष्ट्रवादीची टीका

दत्तक धोरणावर राष्ट्रवादीची टीका

Next

मुंबई : मुंबईतील मोकळ्या जागा आणि मैदाने खाजगी तत्त्वावर दत्तक देण्याबाबत सुधार समितीत झालेला निर्णय म्हणजे, मुंबईतील उरल्या सुरल्या जागा गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला.
महापालिकेच्या अखत्यारितील सर्वच बाबी खासगी व्यक्ती आणि संस्थांकडे सोपवल्या जात आहेत. आता शहरातील रस्तेच शिल्लक राहिले असून, एकदाचे तेही खसगी संस्थांकडे सोपवा, असा टोलाही अहिर यांनी सत्ताधारी लगावला. कालपर्यंत जो भाजपा या प्रस्तावाला विरोध करत होता, तोच भाजपा आता या प्रस्तावाच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. त्यांच्या भूमिकेमागे नक्कीच आर्थिक समीकरणे असून, या धोरणाला राष्ट्रवादी विरोध करणार असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले.

Web Title: NCP's criticism on adoption policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.