राष्ट्रवादीत वाढली धुसफूस
By admin | Published: February 3, 2017 04:39 AM2017-02-03T04:39:23+5:302017-02-03T04:39:23+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून सुरुवात झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून सुरुवात झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली असून, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. संसदीय निवड मंडळाची बैठक होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दिल्याच्या कारणावरून पक्षनेत्यांसमक्षच जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांना निफाड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे.
बुधवारी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर होते. याच दौऱ्याप्रसंगी निफाड तालुक्यातील एका गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुक असलेल्या एका माजी जिल्हा परिषद सदस्याने ‘दादांची’ भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या माजी सदस्यांसमवेत त्यांचे कार्यकर्तेही होते. दादांनी त्यांना ‘त्र्यंबकला या’ असा निरोप दिला. त्यामुळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य कार्यकर्त्यांसह त्र्यंबकेश्वरला राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या ठिकाणी गेले. तेथे गेल्यावर दादा स्थानिक राष्ट्रवादी कॉँग्रेस पदाधिकाऱ्याच्या
घरी ‘जेवणाला’ गेल्याचे कळताच
या इच्छुकांनी या राष्ट्रवादी
कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे निवासस्थान गाठले.
तेथे दादांना या गटातील उमेदवारीवरून संबंधित माजी सदस्याने व त्यांच्या समर्थकांनी विचारणा केली. त्यावेळी जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांना दादा समक्षच या नाराज कार्यकर्त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावल्याचे समजते. दादांनीही मग एकत्र बसून वादाच्या ठिकाणी निर्णय घ्या, असा सल्ला देत मेळाव्याकडे प्रस्थान केले. या सर्व प्रसंगाची कुणकुण या गटातून ज्यांना पक्षाच्या उमेदवारीचे एबी फॉर्म मिळाले आहेत, त्या इच्छुक उमेदवाराने मग थेट व्यासपीठावर जाऊन दादांची कानगोष्टी केल्याचे कळते. दादांनी मग आपल्या भाषणात ओघानेच ‘गरिबांना उमेदवारी द्या, निवडून येणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी द्या’ असा उपदेश दिला. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
बागलाणलाही नाराजी
- बागलाण तालुक्यातही राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उमेदवारीवरून ‘भाऊबंदकी’
उफाळून आल्याने
एका विद्यमान सदस्यांचे तिकीट कापल्याची चर्चा राष्ट्रवादीमध्ये आहे.
याची कुणकुण लागल्याने या सदस्याने थेट बुधवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस भवन गाठत दादांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. या नाराज सदस्याने पक्षाने उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट सांगावे, आपल्याला सत्ताधारी पक्ष तिकीट घेऊन आपल्यामागे तगादा लावत असल्याची स्पष्ट कल्पना राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याची चर्चा