राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी माझी सुपारी दिली
By Admin | Published: September 5, 2014 11:27 PM2014-09-05T23:27:07+5:302014-09-05T23:27:07+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतांनाही त्याच पक्षातील काही नेत्यांनी मला मारण्याची सुपारी दिली होती. या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांना कल्पना दिली होती.
बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतांनाही त्याच पक्षातील काही नेत्यांनी मला मारण्याची सुपारी दिली होती. या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांना कल्पना दिली होती. मात्र त्यांनी याप्रकरणात आपल्याला कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे स्वपक्षातील विरोधकांना माङया विरोधात कटकारस्थान रचण्यास वाव मिळाला पक्षाची ही नीती आपल्याला न पटल्याने नाईलाजास्तव पक्षाचा राजीनामा देण्याची वेळ आली असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.
आमदार किसन कथोरे समर्थकांचा मेळावा बदलापूरात आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात कथोरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केले. ते म्हणाले की, मला नेहमीच पक्षाच्या मदतीविनाच निवडणुका लढाव्या लागल्या आहेत. माझा पराभव करण्यसाठी सर्वपक्षीय विरोधकांसह पक्षांतर्गत बांडगुळे देखील सज्ज होती. मात्न जनता माङया सोबत असल्याने माझा कधीच पराभव झाली नाही आणि आता पराभव होत नाही म्हंटल्यावर जीवालाचा धोका निर्माण झाल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याच कथोरे यांनी सांगून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
गेल्या अनेक वर्षापासून पक्षांतर्गत विरोधक कसे विरोध करीत आहेत त्याचा पाढा वाचला यात त्यांनी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार गोटीराम पवार, नगरसेवक आशिष दामले यांच्यावर हल्ला चढवला. गेल्या विधानसाभा निवडणुकीच्या वेळीस बंडखोरी करून गोटीराम पवार यांनी निवडणूक लढवली. मात्न त्यांना दोनच महिन्यात पक्षात परत घेऊन त्यांचाचा सन्मान केला. त्यापूर्वी अंबरनाथ विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी पुंडीलक म्हात्ने आणि श्याम गायकवाड यांनी विरोधात निवडणूक लढवली त्यातील पुंडीलक म्हात्ने यांना पक्षात घेवून कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे महापौरपद दिले. पक्षातंर्गत विरोधकांशी सातत्याने झगडावे लागत बसल्याने व माङयाबरोबर प्रामणिकपणो काम करणा:या कार्यकत्र्यावर सातत्याने अन्याय होत असल्याने पक्ष सोडल्याचे सांगितले. पक्षातील नेत्यांची सेवा करण्यात आपण कमी पडल्यानेच हुजरेगिरी करणारी बांडगुळे पक्षात तयार झाली असे म्हणत त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. कार्यकत्यांशी बोलुनच लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याच कथोरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असली तरी आपल्याला शिवसेना, भाजप मनसे आणि आरपीआय पक्षांकडून प्रवेशासाठी आमंत्रण आल्याचे कथोरे यांनी सांगितले. यावेळी शरद तेली, मिथुन कोशिंबे, नरहरी पाटील, विवेक मोरे, रमेश सोळसे, शैला बोराडे, राजेश पाटील आणि भानुदास शेलार आदी उपस्थित होते.