राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके लवकरच शिवसेनेत!
By admin | Published: June 18, 2017 02:24 AM2017-06-18T02:24:10+5:302017-06-18T02:24:10+5:30
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट.
नंदकिशोर नारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून राष्ट्रवादीचे वाशिम जिल्ह्यातील नेते माजी आमदार प्रकाश डहाके यांचा शिवसेनेत प्रवेश होणार, या चर्चेवर डहाके यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने शिक्कामोर्तब झाले आहे. शनिवारी डहाके यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने येत्या काही दिवसांतच डहाके यांचा शिवसेना प्रवेश निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेले प्रकाश डहाके यांना गत विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांना पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्या त आली. पक्षावर नाराज असलेले प्रकाश डहाके तेव्हापासून शिवसेनेच्या संपर्कात होते. बर्याचदा त्यांचा पक्षप्रवेश झाल्याच्या वावड्या उडाल्या होत्या; परंतु त्यांनी दुजोरा दिला नव्ह ता. शनिवार, १७ जून रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतल्याची चर्चा झाल्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भेट घेतल्याचा दुजोरा दिला. प्रकाश डहाके हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे डहाके यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुधीर कव्हर होते. यावेळी निवडणूक अर्ज भरण्याच्या अगोदरच्या दिवशी प्रकाश डहाके यांचा शिवसेनेत प्रवेश होऊन त्यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चेने जोर धरला असता संपूर्ण मतदारसंघात खळबळ उडाली होती.
यावेळी मात्र त्यांनी येत्या विधानसभेला बराच अवधी असताना संपर्क केल्याने शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कारंजा विधानसभा म तदारसंघाकडून शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून चालत आहे. डॉ. राठोड यांच्या सर्मथकांमध्ये तर चक्क निवडणुकीची तयारी चालविली असताना प्रकाश डहाके यांचा प्रवेश येत्या विधानसभा की लोकसभा निवडणुकीसाठी आहे, यावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
आपण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून, त्यांनी आपले स्वागत केले आहे. लवकरच शिवसेनेत आपण प्रवेश करणार आहे. पक्षप्रवेश कुठे, कसा व कधी करायचा, हे ठरवून प्रवेश होणार आहे. मग तो कारंजा येथेसुद्धा होऊ शकतो.
- प्रकाश डहाके, माजी आमदार,
कारंजा विधानसभा मतदारसंघ.