राष्ट्रवादीचे ‘मेक इन दुष्काळ’

By admin | Published: January 26, 2016 03:04 AM2016-01-26T03:04:06+5:302016-01-26T03:04:06+5:30

राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार मेक इन इंडियासारखे भपकेबाज कार्यक्रम आयोजित करीत आहे. सरकारची ही पंचतारांकित उधळपट्टी कळावी म्हणून मेक इन इंडियाच्या

NCP's Make in Drought | राष्ट्रवादीचे ‘मेक इन दुष्काळ’

राष्ट्रवादीचे ‘मेक इन दुष्काळ’

Next

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार मेक इन इंडियासारखे भपकेबाज कार्यक्रम आयोजित करीत आहे. सरकारची ही पंचतारांकित उधळपट्टी कळावी म्हणून मेक इन इंडियाच्या आयोजनस्थळावर थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
गुंतवणूक आणि उद्योगांना चालना देण्यासाठी मुंबईतील बीकेसी मैदानावर मेक इन इंडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीने मात्र या कार्यक्रमासाठी होणाऱ्या उधळपट्टीचा विरोध केला आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत इस्रायल, दावोस, जपान, लंडन यासह अनेक देशांत दौरे केले. या दौऱ्यांतून नेमकी किती गुंतवणूक राज्यात आली हा संशोधनाचा विषय आहे. मुंबईतील कार्यक्रमासाठी
१ लाख चौरस मीटर परिसरात १० वातानुकूलित शामियाने उभारण्यात येणार आहेत. निधीअभावी शेतकऱ्यांना मदत नाकारणाऱ्या सरकारने मेक इन इंडियाचा पैसा दुष्काळग्रस्तांकडे वळवावा, अशी मागणी अहिर यांनी केली.

Web Title: NCP's Make in Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.