राष्ट्रवादीचे आंदोलन
By admin | Published: October 24, 2015 03:52 AM2015-10-24T03:52:27+5:302015-10-24T03:52:27+5:30
वाढत्या महागाईमुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. तटकरे
मुंबई : वाढत्या महागाईमुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. तटकरे म्हणाले, भाजपा सरकार सत्तेत येऊन दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तर राज्यात ३१ आॅक्टोबर रोजी भाजपा-शिवसेना सरकार आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करीत आहे. या दोन्ही सरकारांनी सत्तेत येताच महागाई कमी करू, असे आश्वासन जनतेला दिले होते; परंतु महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस २५ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात, तहसील पातळीवर तर मुंबई येथे २६ आॅक्टोबरला सरकारविरोधात ‘थाळी नाद’ करून हल्लाबोल आंदोलन करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)