राष्ट्रवादीचा नगरसवेक सहा महिन्यांसाठी तडीपार
By Admin | Published: January 24, 2017 11:03 PM2017-01-24T23:03:11+5:302017-01-24T23:03:11+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे एसडीओ ओ.आर. अग्रवाल यांनी दिला.
‘एसडीओं’चा आदेश
अकोला: महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, विविध गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) ओ.आर. अग्रवाल यांनी सोमवारी दिला.
अकोला शहरातील बैदपूरास्थित लाल बंगला येथील रहिवासी नकीरखान अहमदखान राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्ममान नगरसेवक आहेत. नगरसेवक नकीरखान विरुद्ध रामदासपेठ व अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत विविध प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी शस्त्र अधिनियम (आर्म अॅक्ट) अंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. या पृष्ठभूमीवर पोलीस विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी ओ.आर. अग्रवाल यांनी दिला. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची राजकीय पक्षांची धामधूम सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नकीरखान यांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
---------------
विविध गुन्हे दाखल असल्याने, पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी दिला.
- ओ.आर.अग्रवाल
उपविभागीय अधिकारी, अकोला.