मुख्यमंत्र्यांच्याआधी निळू फुले नाट्यगृहाचे उदघाटन करणा-या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:47 PM2017-08-12T12:47:55+5:302017-08-12T13:02:40+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित केले नाही.

NCP's office-bearers arrested for inauguration of the Nilu Phule Natyagriha before Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्याआधी निळू फुले नाट्यगृहाचे उदघाटन करणा-या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना अटक

मुख्यमंत्र्यांच्याआधी निळू फुले नाट्यगृहाचे उदघाटन करणा-या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना अटक

Next


पिंपरी, दि. 12 - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित केले नाही. या निषेधार्थ दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणा-या नाट्यगृहाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसने सकाळीच उरकून टाकले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अगोदर उद्घाटन केल्यामुळे सांगवी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना ताब्यात घेतले आहे.  

पिंपळेगुरव येथे महापालिकेतर्फे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह बांधले आहे. या नाट्यगृहाचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडात झाले होते. या नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी  दुपारी तीनला भोसरीतून ई उद्घाटन करण्यात येणार होते. 

काम पूर्ण नसतानाही नाट्यगृहाचे उद्घाटन करण्याची घाई सत्ताधाºयांना होती. याबाबत नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आक्षेप घेतला होता. उद्घाटनाची घाई करू नका अशी मागणी त्यांनी केली होती. यावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. तसेच उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बोलविले नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सत्ताधारी भाजपचा निषेध करत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते उद्घाटन केले. 

यावेळी नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, श्याम जगताप, शोधा अदियाल, तानाजी जवळकर, शिवाजी कर्डिले, श्वेता इंगळे आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अगोदर उद्घाटन केले म्हणून सांगवी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांना ताब्यात घेतले आहे. 

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘नाट्यगृहाचे काम न्यायालयीन कचाट्यात अडकले होते. मी स्वत: नगरसेवक असताना नाट्यगृहासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे पाठपुरावा करुन काम पुर्ण केले आहे. नाट्यगृहाच्या कामाचे भुमिपुजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. तसेच त्याचे कामही राष्ट्रवादीच्या काळात पुर्ण झाले आहे. भाजप राष्ट्रवादीच्या कामाचे उद्घाटन करुन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. विकास कामांचे ज्याचे श्रेय त्यास द्यायला हवे. शहराच्या विकासाचे शिल्पकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला बोलविणे गरजेचे होते. मात्र, संकुचित विचार करणाºया भाजपाच्या नेत्यांनी त्यांना बोलाविले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना न बोलविल्यामुळे आणि राष्ट्रवादीच्या काळातील काम असल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या अगोदर नाट्यगृहाचे उद्घाटन केले.’’

Web Title: NCP's office-bearers arrested for inauguration of the Nilu Phule Natyagriha before Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.