राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे

By admin | Published: October 17, 2014 02:12 AM2014-10-17T02:12:58+5:302014-10-17T02:12:58+5:30

सरकार स्थापण्यात निर्णायक भूमिका वठविण्याची संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर तिस:या आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतील,

NCP's steps are third: these leaders | राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे

राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे

Next
यदु जोशी ल्ल मुंबई
विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापण्यात निर्णायक भूमिका वठविण्याची संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर तिस:या आघाडीची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतील, अशी दाट शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल आणि सत्ता स्थापन करण्यासाठी या पक्षाला काही जागा कमी पडतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. अशा परिस्थितीत भाजपाबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेऊन दुय्यम भूमिका स्वीकारण्यापेक्षा आतार्पयत भाजपापासून दूर राहत जपलेली धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम ठेवावी, असे पक्षातील अनेक नेत्यांना वाटते. काहीही करून सत्तेत राहण्याचा हव्यास पक्षाची प्रतिमा आणखीच खराब करेल. आधीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि त्या आधीपासूनच राष्ट्रवादीची प्रतिमा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मलिन झालेली असताना आता धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशी तडजोड करणो म्हणजे उरलीसुरली इज्जत घालविण्यासारखे होईल, असे पक्षातील जाणत्या नेत्यांचे म्हणणो आहे. काँग्रेस आणि भाजपा वगळता इतर पक्षांची एक तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली आधीच देशात सुरू झाल्या आहेत. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार हे नेते बिहारमध्ये एकत्र आले. मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या संमेलनात अलिकडे संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांना आमंत्रित करण्यात आले होते. अशावेळी काँग्रेसप्रणित युपीएमधून बाहेर पडून सक्षम तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समाजवादी पार्टी, राजद, संयुक्त जनता दल, बिजू जनता दल, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल  अशा अनेक लहानमोठय़ा पक्षांना एकत्र आणून भाजपा आणि काँग्रेसचा पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 
स्वत: पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या बाबतचे सूतोवाच या आधीच आणि विशेषत: विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानच केले आहे. तिस:या आघाडीचा एखादा प्रस्ताव आमच्यासमोर आला तर आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करू, असे पवार यांनी म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी युपीएमधून बाहेर पडू शकते असे स्पष्ट संकेत पटेल यांनी दिले होते. 
 
भाजपा, काँग्रेस, शिवसेनेपेक्षाही राष्ट्रवादीला कमी जागा मिळतील, असे एक्झीट पोलमध्ये सांगितले आहे. राष्ट्रवादीचे सहा लोकसभा सदस्य आहेत. पक्षाचे मुख्य अस्तित्व महाराष्ट्रात आहे. 
 
काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली असल्याने आता राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादीला काँग्रेससोबत राहण्यात फारसा रस नसेल्यामुळे राष्ट्रवादीची पावले तिस:या आघाडीकडे वळतील, असे मानले जात आहे. 

 

Web Title: NCP's steps are third: these leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.