महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राष्ट्रवादीचा ‘रस्ता रोको’

By admin | Published: August 4, 2014 03:22 AM2014-08-04T03:22:13+5:302014-08-04T03:22:13+5:30

मराठी भाषिकांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा आहे. तेथील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरसारखा अत्याचार पुन्हा केला, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कर्नाटकात घुसतील

NCP's 'Stop the Road' on Maharashtra-Karnataka border | महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राष्ट्रवादीचा ‘रस्ता रोको’

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राष्ट्रवादीचा ‘रस्ता रोको’

Next

कागल (जि. कोल्हापूर) : कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्यावतीने रविवारी पुणे-बंगलोर महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा असणाऱ्या दूधगंगा नदीजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. तब्बल दीड तास महामार्ग रोखून धरण्यात आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मराठी भाषिकांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा आहे. तेथील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरसारखा अत्याचार पुन्हा केला, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कर्नाटकात घुसतील, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आमदार विद्या चव्हाण यांनी दिला. यावेळी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. येळ्ळूर ंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते येणार असल्याच्या वृत्तामुळे पोलिसांनी येळ्ळूर मार्गाची काही काळ नाकाबंदी केली होती. पण राष्ट्रवादीचे नेते बेळगावला आलेच नाहीत. पण दिवसभर बेळगाव शहरात नारायण राणे, मंत्री सतेज पाटील येणार अशा चर्चांना मात्र ऊत आला होता.

Web Title: NCP's 'Stop the Road' on Maharashtra-Karnataka border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.