‘एनडीआरएफ’ अधिक सशक्त करणार

By admin | Published: September 17, 2015 01:52 AM2015-09-17T01:52:53+5:302015-09-17T01:52:53+5:30

नैसर्गिक व मानवी आपत्तीमुळे देशातील विकासाचा दर दोन टक्क्यांनी कमी राहिला आहे. तेव्हा वाढत्या नागरीकरणाच्या आजच्या काळात नैसर्गिक

'NDRF' will be more powerful | ‘एनडीआरएफ’ अधिक सशक्त करणार

‘एनडीआरएफ’ अधिक सशक्त करणार

Next

नागपूर : नैसर्गिक व मानवी आपत्तीमुळे देशातील विकासाचा दर दोन टक्क्यांनी कमी राहिला आहे. तेव्हा वाढत्या नागरीकरणाच्या आजच्या काळात नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित आपत्तीची संभाव्यता लक्षात घेऊन सर्व नागरिक आणि नागरी संरक्षणाशी संबंधित
सर्वांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे.
त्यासाठी ‘नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स’ (एनडीआरएफ)ला अधिक सशक्त करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी येथे केले.
राष्ट्रीय नागरिक सुरक्षा महाविद्यालयात आयोजित उमंग-२०१५ या नागरी संरक्षणविषयक विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांना उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख
पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी एनडीआरएफचे महासंचालक ओ.पी. सिंग उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'NDRF' will be more powerful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.