मुळशीत सव्वा दोन हजार मतदारांनी वापरला नोटा

By admin | Published: February 27, 2017 12:17 AM2017-02-27T00:17:37+5:302017-02-27T00:17:37+5:30

यावर्षी जवळपास २३५४ मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोटा अधिकाराचा वापर करीत उमेदवारांना नाकारले आहे.

Nearly two thousand voters used to get money | मुळशीत सव्वा दोन हजार मतदारांनी वापरला नोटा

मुळशीत सव्वा दोन हजार मतदारांनी वापरला नोटा

Next


पिरंगुट : मुळशी पंचायत समितीमध्ये असलेल्या सहा गणांमध्ये व जिल्हा परिषदेत असलेल्या तीन गटांमध्ये यावर्षी जवळपास २३५४ मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोटा अधिकाराचा वापर करीत उमेदवारांना नाकारले आहे.
मुळशी पंचायत समितीसाठी असलेल्या एकूण सहा गणांमध्ये त्यातील मुळशी तालुक्यातील असलेले मुख्य ठिकाण पौड
गणामध्ये एकूण १३२ मतदारांनी नोटाचे बटण दाबून उमेदवाराला नाकारले आहे. तसेच कासारआंबोली गणातून १४६ मतदारांनी नोटाचा वापर करून उमेदवाराला नाकारले आहे. माण गणामध्ये एकूण २९३ मतदारराजांनी नोटा या अधिकाराचा वापर करून उमेदवारांना नाकारले आहे.पिंपरी-चिंचवड शहराजवळील असलेल्या व आयटीनगरी लाभलेल्या हिंजवडी गणामधून ९८ मतदारांनी नोटाचा वापर करून उमेदवारास नाकारले आहे. पुणे शहराजवळील असलेल्या बावधन गणामध्ये १६७ मतदारांनी नोटाचा वापर केलेला आहे व औद्योगिक वसाहत असलेल्या पिरंगुट व
त्याला जोडलेल्या मुठा खोरे व मोशी खोरे गावातील १८७ मतदारराजांनी पिरंगुट गणामध्ये नोटाचा वापर करून उमेदवारांना नाकारले. मतदारराजांनी फक्त पंचायत समितीमध्येच नोटा या आपल्या मताचा अधिकार वापरलेला नसून जिल्हा परिषदेच्या गटामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात या
अधिकाराचा वापर केल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
जिल्हा परिषदेसाठी असलेल्या तीन गटापैकी पौड-कासारआंबोली गटामध्ये ६१९ मतदारराजाकडून नोटा या आपल्या अधिकाराचा वापर करून उमेदवाराला नाकारले. माण-हिंजवडी गटामध्ये १९१ व बावधन-पिरंगुट गटामध्ये एकूण ५२१ मतदारांनी नोटाचा वापर करून उमेदवारांना नाकारलेले आहे.

Web Title: Nearly two thousand voters used to get money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.