क्लिनिकल ट्रायलविषयी जागृती हवी

By admin | Published: May 20, 2016 01:54 AM2016-05-20T01:54:28+5:302016-05-20T01:54:28+5:30

उस्मानाबादमधील २ वर्षांच्या एका मुलाच्या हातावर, पायांवर, तसेच शरीराच्या काही अन्य भागांवर रक्त साकळून गाठ तयार होत होती

Need awareness about clinical trials | क्लिनिकल ट्रायलविषयी जागृती हवी

क्लिनिकल ट्रायलविषयी जागृती हवी

Next


पुणे : उस्मानाबादमधील २ वर्षांच्या एका मुलाच्या हातावर, पायांवर, तसेच शरीराच्या काही अन्य भागांवर रक्त साकळून गाठ तयार होत होती. ही गाठ उपचार केल्यानंतरदेखील वारंवार येत होती. अनेक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पालकांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले. त्या वेळी त्याला रक्तस्रावाशी संबंधित हेमोफिलीया हा विकार झाल्याचे समजले.
हेमोफेलीया या विकारावर उपचार करण्यासाठी लागणारी ही औषधे ही महाग असून सर्वसामान्य माणसांना ती न परवडणारी आहेत. परंतु हेमोफेलीयाग्रस्त मुलाच्या या पालकांना त्यांच्या २ वर्षाच्या मुलावर उपचार करणे शक्य झाले ते ते केवळ क्लिनिकल ट्रायलमुळे. स्वेच्छेने क्लिनिकल ट्रायलसाठी तयार झालेल्या रुग्णामुळेच वैद्यकीयशास्त्रात नवी औषधे व उपचारांच्या नव्या पद्धती व त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.
आपल्याला ताप आला, खोकला आला,सर्दी झाली की आपण लगेच डॉक्टरांकडून औषध घेतोव त्या औषधाच्या सेवनाने आपला आजार बरा होतो. आज असणाऱ्या जागतिक क्लिनिकल ट्रायल दिवसाच्या निमित्ताने क्लिनिकल ट्रायल्सचे विविध औषधांच्या तसेच वैद्यकीय उपचारांच्या विकासात असणारे महत्व व त्याद्वारे क्लिनिकल ट्रायल्सने मानवी जीवनामध्ये घडवून आणलेला आमूलाग्र बदल जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. २० मे रोजी जेम्स लींड या सर्जनच्या स्मृतीप्रीत्यर्थ जागतिक क्लिनिकल ट्रायल दिवस साजरा केला जातो. क्लिनिकल ट्रायल्स विषयी बोलताना सह्याद्री हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. दीपा दिवेकर म्हणाल्या, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लिनिकल ट्रायल्स सुरु आहेत. परंतु, लोकसंखेच्या तुलनेत क्लिनिकल ट्रायल मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या खुपच कमी आहे. क्लिनिकल ट्रायल विषयी जनजागृती खूपच कमी आहे व अनेकदा रुग्ण, मी जर अशा ट्रायल मध्ये सहभागी झालो तर माझ्या जीवाचे काही बरे वाईट होईल का? या भीतीपोटी क्लिनिकल ट्रायल मध्ये सहभागी होणे टाळतात. मात्र हे चुकीचे असून याविषयाबाबत जागृती होणे गरजेचे आहे. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ या संस्थेनुसार जगभरामध्ये १७ मे २०१६ पर्यंत क्लिनिकल ट्रायल्सच्या २,१५,७५२ केसेस नोंदवल्या आहेत.
क्लिनिकल ट्रायल हे असे एक वैज्ञानिक संशोधन आहे की, ज्याद्वारे नव्याने तयार करण्यात आलेली औषधे त्यांच्या सेवनाची सुरक्षितता व त्यांची रोगांवर मात करण्याची कार्यक्षमता तपासली जाते. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये एखादा वैद्यकीय उपचार तसेच वैद्यकीय उपकरणे ही मानवी शरीराला उपयुक्त व सुरक्षित आहेत का? हे देखील तपासले जाते. क्लिनिकल ट्रायलच्या या प्रक्रियेमध्ये प्रोटोकॉलया दस्तऐवजाचा वापर करण्यात येतो. क्लिनिकल ट्रायलसाठी एख्याद्या रुग्णाने स्वेच्छेने त्या प्रकियेत सहभागी होणे आवश्यक असते. त्यातूनच भविष्यातील विविध रोगांवरील उच्च प्रतीची औषधे व वैद्यकीय उपचार, उपकरणे विकसित होऊ शकतात.

Web Title: Need awareness about clinical trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.