संमेलनाध्यक्षांची निवडप्रक्रिया बदलण्याची गरज : शरद पवार

By admin | Published: January 17, 2016 01:01 AM2016-01-17T01:01:46+5:302016-01-17T01:01:46+5:30

‘‘मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र

Need to change the selection process of the meeting: Sharad Pawar | संमेलनाध्यक्षांची निवडप्रक्रिया बदलण्याची गरज : शरद पवार

संमेलनाध्यक्षांची निवडप्रक्रिया बदलण्याची गरज : शरद पवार

Next

- हणमंत पाटील, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
‘‘मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र येऊन पुढील अध्यक्षांची निवड करावी,’’ अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष निवडप्रक्रियेची पद्धत बदलण्याचा सल्ला दिला.
पिंपरी-चिंचवड येथील ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी त्यांनी निवडीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात निवडणूकप्रक्रिया बदलण्याविषयी पवार यांच्या मताला अनुमोदन दिले. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड मतदान प्रक्रियेमुळे होत असल्याने अनेक चांगले साहित्यिक संमेलनापासून दूर राहणे पसंत करतात. हे चित्र बदलण्यासाठी निवडप्रक्रिया बदलावी लागेल. मते मिळविण्यासाठी आम्हाला काय काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती नाही. तो आमचा अधिकार आहे. त्याविषयी उघडपणे बोलणार नाही. चार ते पाच माजी अध्यक्षांची एकत्र समिती तयार केली, तर या समितीद्वारे खऱ्या अर्थाने उत्तम साहित्यिकांना संधी मिळू शकते. धर्मनिरपेक्षता व सहिष्णुता हे चर्चेत असलेले शब्द उच्चारण्यासाठी जितके कठीण आहेत तसेच, ते आचरणात आणण्यासाठी कठीण आहेत, असे पवार यांनी सांगितले.

पवारांचा हात असल्याचा गैरसमज
महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीत शरद पवार यांचा हात असल्याचा समज पसरवला जातो. काही तथाकथित विचारवंतांच्या म्हणण्यानुसार संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीतही माझा हात असल्याचा आरोप होतोय, अशा पद्धतीने आम्हाला वादात ओढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सबनीस यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयुष्यात मी त्यांना प्रथमच भेटलो. उद्या लातूर व कोयनेला भूकंप झाला, तरी पवार यांचा हात असल्याचा समज पसरविला जाईल.
- शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री

Web Title: Need to change the selection process of the meeting: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.