गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज - मीरा बोरवणकर
By admin | Published: March 2, 2016 05:58 PM2016-03-02T17:58:29+5:302016-03-02T17:58:29+5:30
गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (कन्व्हिक्शन रेट) वाढवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्यांच मत मीरा बोरवणकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २ - गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (कन्व्हिक्शन रेट) वाढवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्यांच मत राज्याच्या न्यायिक व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना मीरा बोरवणकर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.
कसाब आणि याकुबच्या फाशीची मी साक्षीदार असल्याचं सांगत कारागृह कर्मचा-यांनी ठेवलेल्या कमालीच्या गुप्ततेबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त करत त्यांचं कौतुकही केलं. एखाद्याला फाशीवर जाताना पाहणं खुप कठीण असतं त्यामुळे सारखं स्वताशी बोलाव लागतं आणि मी तेच करत होते असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं. कारागृह कर्मचा-यांचा जास्त वेळ हा सुरक्षा आणि व्यवस्थापनातच जातो, कारागृह कर्मचारी दमलेले असतात. यामध्ये सुधारणा करण्यासाठी लोकांनी, एनजीओनी पुढे येण्याची गरज असल्याचं मीरा बोरवणकर बोलल्या आहेत. कारागृहांमधील आरोपींची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याची कबुलीही मीरा बोरवणकर यांनी दिली आहे.
ठाण्यात महिला पोलिसाला झालेल्या मारहाणीबद्दल बोलताना महिला पोलीस असो अथवा पुरुष कोणत्याही पोलीस कर्मचा-याला मारहाण करणे हे गंभीर आहे. याचा त्रास आपल्यालाच होणार आहे असं मत मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केलं आहे. खात्यातील महिला पोलिसांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, महिला पोलिसांवर घरचीही जबाबदारी तितकीच असते. महिला आणि पुरुषांची यशाची व्याख्या वेगळी आहे. महिला पोलिसांसाठी 8 तासांची ड्युटी करण्याची गरज असल्याचं मीरा बोरवणकर बोलल्या आहेत. तुम्हाला खरंच समाजासाठी काही करायचं असेल तर सिव्हिल सर्व्हिस आणि पोलीस खाते निवडा मात्र हा 10 ते 6 ऑफिस जॉब नाही हे लक्षात ठेवा असा संदेशही मीरा बोरवणकर यांनी तरुण पिढीसाठी दिला आहे.