पर्यावरणाच्या हितासाठी मानवी पुनर्वसनाची गरज - गोव्याच्या कुलगुरूंचे भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 03:16 PM2016-08-26T15:16:13+5:302016-08-26T15:16:13+5:30

बदलत्या व बिघडत चाललेल्या पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ स्थानिक पातळीवर राहिलेले नाहीत. ते प्रश्न वैश्विक स्तरावर पोहचलेले आहेत.

The need for human rehabilitation for the welfare of the environment - the statement of the Vice Chancellor of Goa | पर्यावरणाच्या हितासाठी मानवी पुनर्वसनाची गरज - गोव्याच्या कुलगुरूंचे भाष्य

पर्यावरणाच्या हितासाठी मानवी पुनर्वसनाची गरज - गोव्याच्या कुलगुरूंचे भाष्य

Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २६ - बदलत्या व बिघडत चाललेल्या पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ स्थानिक पातळीवर राहिलेले नाहीत. ते प्रश्न वैश्विक स्तरावर पोहचलेले आहेत. अंतराळापर्यंत त्यांची झेप गेली आहे. केवळ तंत्रज्ञानाचाच वापर करून हे प्रश्न सोडविता येतील असे नाही तर तंत्रज्ञानापलिकडे जाऊन संस्थात्मक बदलांद्वारे तसेच सामाजिक फेररचना व मानवी वर्तनामधील सुधारणांद्वारे पर्यावरणाचे प्रश्न हाताळले जायला हवेत, असे निवेदन गोवा विद्यापीठाचे नवे कुलगुरू प्रा. वरूण साहनी यांनी शुक्रवारी केले. प्रसंगी मानवी पुनर्वसनही गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
येथील कला अकादमी संकुलात कलाकृती संस्थेतर्फे गोवा पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी वन व पर्यावरण खात्याचे मंत्री  राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी साहनी बोलत होते. साहनी म्हणाले, की देशाच्या पश्मिच किनारपट्टीतील राज्यांमधील विद्यापीठांनी पर्यावरणाच्या विषयावर जागृती करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. गोवा विद्यापीठ स्वत: नागरी समाजाच्या सहभागाने पर्यावरण जागृतीच्या कामात योगदान देईलच. पर्यावरणाच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी केवळ तंत्रज्ञानआधारित रणनीतीवरच अवलंबून राहून चालणार नाही. तंत्रज्ञानापलिकडे जाऊन सामाजिक रचना बदलावी लागेल. प्रत्येक स्तरावरून पर्यावरणाच्या समस्यांविरुद्ध लढावे लागेल. पर्यावरणाचे प्रश्न हे मोठे आव्हान आहे. 
साहनी म्हणाले, की आताच्या नव्या पिढीला पर्यावरणविषयक प्रश्नांची जाण आहे. मात्र पर्यावरणाचे प्रश्न हे विविध पटीने वाढत असल्याने प्रत्येकालाच त्याविरुद्ध लढावे लागेल. दिल्लीचा मी रहिवासी आहे. तिथे प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न झाले तरी देखील हवा प्रदूषण वाढतेय. औद्योगिक क्रांती ज्या पिढीने पाहिली त्या पिढीचा आम्ही आता शेवटचा टप्पा आहोत. यापुढे कदाचित प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी व पाण्याच्यी तीव्रतेसारख्या समस्या टाळण्यासाठी मानवी वस्तींचे स्थलांतर व पुनर्वसन घडवून आणणोही गरजेचे ठरेल. हा विषय मन दुखविणारा असला तरी, त्यासाठी धोरण ठरवावे लागेल.
संदीप आजरेकर यांचा गौरव
पर्यावरण रक्षण आणि वन क्षेत्रंचा सांभाळ व्हावा म्हणून न्यायालयार्पयत धाव घेऊन लढणारे कार्यकर्ते म्हणून संदीप आजरेकर यांना निसर्ग मित्र पुरस्कार देऊन यावेळी मंत्री आर्लेकर व साहनी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केपे व बेतोडा येथील बरीच हेक्टर वन जमीन वाचविणो आजरेकर यांच्यामुळे शक्य झाले आहे, असे आयोजकांनी सांगितले.
मंत्री आर्लेकर यांनीही यावेळी विचार मांडले. निसर्गाच्याविरुद्ध असलेली जीवनशैली बाजूला ठेवून निसर्गाशी मैत्री करणारीच जीवनशैली प्रत्येकाने अंगिकारावी, असे आवाहन आर्लेकर यांनी केले. यावेळी अॅड. सतिश सोनक, प्रेरणा पावस्कर व पर्यावरणविषयक मासिकाच्या संपादक रिटा मोदी जोशी व्यासपीठावर होत्या. सोनक यांनीही विचार मांडले. पणजी, म्हापसा, मिरामार अशा ठिकाणच्या रोटरी क्लबांचा यावेळी गौरव करण्यात आला.
(खास प्रतिनिधी)

Web Title: The need for human rehabilitation for the welfare of the environment - the statement of the Vice Chancellor of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.