रामायण आणि महाभारतावर नवदृष्टीकोनाची गरज : वैंंकय्या नायडू  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 07:26 PM2019-09-26T19:26:01+5:302019-09-26T19:29:59+5:30

आता इतिहास, पुरातत्व, मानववंशशास्त्र, प्रतीकशास्त्र व समाजशास्त्र विषयातील तज्ज्ञांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे...

Need for a new perspective on the Ramayana and Mahabharata: Venkaiah Naidu | रामायण आणि महाभारतावर नवदृष्टीकोनाची गरज : वैंंकय्या नायडू  

रामायण आणि महाभारतावर नवदृष्टीकोनाची गरज : वैंंकय्या नायडू  

Next
ठळक मुद्दे ऐतिहासिक स्मारकांबद्द्ल शाळेच्या मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक साहित्य, इतिहास व पुरातत्वाबद्दलचा एक बळकट दृष्टीकोन प्रस्थापित होईलपुरातत्त्व हे किमया करणारे शास्त्र

पुणे : गेल्या काही वर्षांपासून भारतातील पुरातत्व अभ्यासक, इतिहास संशोधक,तज्ज्ञ यांच्यामध्ये ''रामायण'' व ''महाभारत''  हा इतिहास आहे की काव्य यामध्ये विवाद आहे. यासाठी आता इतिहास, पुरातत्व, मानववंशशास्त्र, प्रतीकशास्त्र व समाजशास्त्र विषयातील तज्ज्ञांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. संस्कृत परंपरेला मानणाऱ्या इतिहास व पुरातत्व अभ्यासकांनी हे आव्हान स्वीकारावे. त्यातून भूतकाळातील प्रकाशझोतात न आलेली माहिती अत्यंत अचूक पद्धतीने जगासमोर येईल व इतिहास व संस्कृतीला एक नवीन दिशा मिळेल, असा विश्वास उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. 
पुण्यभूषण फाउंडेशन व पुणेकरांच्या वतीने उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉ. देगलूरकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान केला. एक लाख रुपये व स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. के. ए. संचेती, सिंबायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी कसोटीपटू चंदू बोर्डे व प्रतिष्ठानचे डॉ. सतीश देसाई उपस्थितहोते. या प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी महंमद चांदभाई शेख, वीरमाता लता नायर, अपंग सैनिक फुलसिंग नाईक व गोविंद बिरादर यांना सन्मानित केले. 
वैंकय्या नायडू म्हणाले, भारताला सांस्कृतिक व ऐतिहासिक असा फार मोठा वारसा आहे. पुरातत्व हा भूतकाळ व वर्तमानाला जोडणारा पूल आहे. पुरातत्वशास्त्र हा आकर्षित करणारा असा विषय आहे. ज्यातून अचूक पुराव्याच्या आधारावर इतिहासाविषयीचे आकलन सहजपणे होऊ शकते. भूतकाळातील विविध तथ्य समोर आणण्यासाठी पुरातत्वशास्त्र महत्वाची भूमिका बजावू शकते. प्रागैतिहासिक काळ समजून घेण्याचे हेच एकमेव प्राथमिक साधन आहे. यामध्ये इतिहास पुनर्रचना आणि पुनरूज्जिवित करण्याची क्षमता आहे. ह्यपुरातत्वशास्त्रह्ण संस्कृतीची वैविध्यता व नागरीकरणावर प्रकाश टाकू शकते. भूतकाळातील आपल्या मुळांचा शोध घेण्यासाठी पुरातत्वशास्त्र अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते. 
भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत श्रीमंत राष्ट्र आहे. जानेवारी २०१९ पर्यंत ३६०० संरक्षित स्मारकांचे राष्ट्रीय महत्व लक्षात घेऊन केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे संवर्धन केले जात आहे. इतिहास व संस्कृतीचा संबंध हा मानवी जीवनाशी आहे. शासन या पुरातत्वीय जागांचे संवर्धन करण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याला बळकटी आणण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. या स्मारकांचे जतन व संरक्षण करणे ही देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. सार्वजनिक क्षेत्रासह खासगी फर्म्स तसेच वैयक्तिक स्तरावर या पुरातत्व जागा दत्तक घेऊन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. उदा: श्रीरंगम येथील श्री रंगनाथा स्वामी मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने देणगीदारांच्या सहकायार्तून उचलली आहे. याशिवाय ऐतिहासिक स्मारकांबद्द्ल शाळेच्या मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.  पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर व केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांचे पुरात्वशास्त्रातील योगदान महत्वपूर्ण आहे. विविध विषयातील तज्ञांच्या दृष्टीकोनातून साहित्य, इतिहास व पुरातत्वाबद्दलचा एक बळकट दृष्टीकोन प्रस्थापित होईल. भारतीय प्राचीन लिखित व पुरातत्वीय अभ्यासाच्या सहकायार्साठी हा दृष्टीकोन निश्चित उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली.
............
डॉ. गो. बं देगलूरकर म्हणाले, मराठवाडा जन्मभूमी असलेल्या माझ्यासारख्या माणसाला पुण्याच्या विद्वानांनी पुरस्कार दिल्यामुळे या पुरस्काराचे क्षेत्र आता विस्तारित झाले आहे. आपापल्या कार्यक्षेत्राची मशागत व्यासंगीपणे केली पाहिजे असे स्मृतिचिन्हाद्वारे सांगण्यात आले असून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. भारतीय संस्कृती सनातन आहे. सनातन म्हणजे प्राचीन नव्हे तर नित्यनूतन आहे. त्यामध्ये कला, आध्यात्म, मंदिर स्थापत्य व मूर्तिशास्त्र महत्त्वाचे आहे.ह्यअरूपाचे रूप दावीनह्ण हे मूर्तिशास्त्राचे वैशिष्ट्य आहे.ह्ण माती असशी मातीस मिळशीह्ण हे अनंत फंदी यांचे काव्य उत्खननाला लागू नसे. उत्खनानातून प्राचीनतम प्राचीन गोष्टींचा शोध घेत नवा इतिहास लोकांसमोर मांडता येतो. एका अर्थाने पुरातत्त्व हे किमया करणारे शास्त्र आहे. 

Web Title: Need for a new perspective on the Ramayana and Mahabharata: Venkaiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.