‘आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची गरज’ : राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:15 AM2018-02-12T02:15:45+5:302018-02-12T02:16:15+5:30
जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़
मांडवी (जि.नांदेड) : जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़
राव यांनी रविवारी येथे जल शुद्धीकरण सयंत्र, बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन, दालमील, शबरी घरकुलाचे उद्घाटन तर जावरला-मांडवी रस्ता व ग्रामीण क्रीडा संकुल उभारणीचे भूमिपूजन केले़ ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्यपालांनी आपण पहिल्या गाव भेट दौºयात प्रस्तावित केलेल्या जवळपास सर्वच कामांची पूर्तता झाली असल्याचे व निजामकालीन राजवटीतला जावरला-आंबाडी-किनवट हा जुना रस्ता नव्याने तयार करून या गावास जोडण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ पाण्याची बचत आणि त्याचा वापर याची पुरेपूर माहिती अवगत करून देण्यासाठी लवकरच पाणी फाऊंडेशनचे एक पथक येथे पाठविणार आहे़