आत्महत्या रोखण्यासाठी वाणांचे संशोधन गरजेचे

By Admin | Published: January 5, 2015 06:34 AM2015-01-05T06:34:30+5:302015-01-05T06:34:30+5:30

वातारणातील बदलांचा प्रतिकुल परिणाम शेतीवर होत आहे. बदलत्या वातावरणाशी सुसंगत असे ताण सहन करू शकणाऱ्या वाणांचे संशोधन प्रगतिपथावर

Need to research the varieties to prevent suicides | आत्महत्या रोखण्यासाठी वाणांचे संशोधन गरजेचे

आत्महत्या रोखण्यासाठी वाणांचे संशोधन गरजेचे

googlenewsNext

मुंबई : वातारणातील बदलांचा प्रतिकुल परिणाम शेतीवर होत आहे. बदलत्या वातावरणाशी सुसंगत असे ताण सहन करू शकणाऱ्या वाणांचे संशोधन प्रगतिपथावर असून दुष्काळ, तापमान, किडी-रोग असे ताण सहन करणाऱ्या वाणांचे प्रसारण करणे आवश्यक आहे, या संशोधनामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय पीक जीनोम संसोशन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. असिस दत्ता यांनी रविवारी केले.
मुंबई विद्यापीठातील भारतीय विज्ञान परिषदेत ‘ताण सहन करणाऱ्या पिकांचे संशोधन आणि भविष्यातील आव्हाने’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. ही परिषद सी.एस. नौटीयाल आणि सी.आर. भाटीया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशातील ३५ ते ४0 टक्के कृषी उत्पादन काढणीच्या जुन्या पद्धतीमुळे वाया जाते. वाया जाणाऱ्या उत्पादनाचे मूल्य ६0 हजार कोटी असून, इंग्लंडची ती वार्षिक गरज असल्याचे ते म्हणाले. हैदराबाद येथील जैवशास्त्र शाळेचे समन्वयक डॉ. ए.एस. राघवेंद्र यांनी ताण सहन करणाऱ्या पिकांमधील फोटोरेस्पीरेशन या विषयावर सादरीकरण केले. (प्रतिनिधी)

Web Title: Need to research the varieties to prevent suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.