कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्रकल्पाची गरज

By Admin | Published: June 5, 2017 02:49 AM2017-06-05T02:49:37+5:302017-06-05T02:49:37+5:30

स्वच्छ शहर म्हणून मानांकन प्राप्त झालेल्या नवी मुंबई शहरात सद्यस्थितीला दैनंदिन घनकचऱ्याचे सुयोग्यरीत्या व्यवस्थापन केले जाते.

The need for a separate project for waste processing | कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्रकल्पाची गरज

कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्रकल्पाची गरज

googlenewsNext

प्राची सोनवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : देशात आठवे आणि राज्यात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकन प्राप्त झालेल्या नवी मुंबई शहरात सद्यस्थितीला दैनंदिन घनकचऱ्याचे सुयोग्यरीत्या व्यवस्थापन केले जाते. असे असले तरीही विघटन न होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प शहरात सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. प्रत्येकाने स्वत:च्या परिसरात निर्माण होणाऱ्या घन कचऱ्याचे प्रमाण कमीत कमी करण्याचे प्रयत्न करायलाच हवेत. त्यापुढची पायरी म्हणजे नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण चार प्रकारांत करावे, असे अपेक्षित आहे. रिसाइकलेबल (पुन्हा प्रक्रिया करता येण्यासारखा), रियुसेबल (आहे त्याच स्वरूपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरता येईल असा), बायोडिग्रेडेबल (विघटन होणारा) आणि प्रक्रि या न करता येण्याजोगा कचरा. असे वर्गीकरण केल्यावर विघटन होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करून त्याचा खत म्हणून वापर करण्याची जबाबदारी नागरिकांनी उचलणे आवश्यक आहे.
नवी मुंबईत ४४६.४८ टन ई-कचरा जमा होतो. ई-कचऱ्याची हाताळणी आणि विल्हेवाट लावणे, ही दिवसेंदिवस एक गंभीर समस्या बनत चालली आहे. या ई-कचऱ्यात विविध प्रकारचे धातू आणि अ‍ॅसिडिक गुणधर्म असलेले पदार्थ असल्याने ते जाळल्यास त्यातून होणाऱ्या उत्सर्जनामुळे मोठा धोका निर्माण होतो. हा ई-कचरा जमिनीत गाडणे किंवा जाळून टाकणे, पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरते. सर्वात चिंतेची बाब हा ई-कचरा अजूनही भंगारवालेच खरेदी करतात, ज्यांच्याकडे वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही.
वेंगुर्ले नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम
वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण शहर प्लास्टिकमुक्त केले जात असून, या ठिकाणी असलेला कचरा बाहेर न जाता येथेच या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, पूर्ण वापर आणि पुनर्वापरावर अधिक भर देण्यात आली आहे.
वेंगुर्ल्यामध्ये सुका, ओला, प्लास्टिक, काच आणि धातू अशा चार वर्गांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. सुक्या कचऱ्यातील कागद ३ रुपये किलो, पुठ्ठा ६ रुपये किलो दराने विकला जातो. कचऱ्यात येणारे कापड व रेक्झीन बॅग्ज सिमेंट कंपनीला देण्यात येते.
स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई शहर चांगली उंची गाठत असले, तरीदेखील कचरा प्रक्रियेवर स्वतंत्रपणे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. यामध्ये पर्यावरणप्रेमींना तसेच नागरिकांना सहभागी करता येऊ शकते. जुईनगर परिसरात खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, काही काळानंतर मात्र पैशांअभावी तसेच अपुऱ्या प्रोत्साहनामुळे हा प्रकल्प बंद पडला. महापालिकेने स्थानिक स्तरावर पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
- सुनील नाईक, पर्यावरणप्रेमी.

Web Title: The need for a separate project for waste processing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.