स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती पुढे नेणे गरजेचे - तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:03 AM2017-08-10T04:03:05+5:302017-08-10T04:03:17+5:30

महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीला गवालिया टँक मैदानावरून ‘छोडो भारत’चा इशारा दिला होता. याच मैदानावर ‘छोडो भारत’ लढ्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता करताना, स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती पुढे नेण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

 Need to take the memory of freedom struggle - Tatkare | स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती पुढे नेणे गरजेचे - तटकरे

स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती पुढे नेणे गरजेचे - तटकरे

Next

मुंबई : महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीला गवालिया टँक मैदानावरून ‘छोडो भारत’चा इशारा दिला होता. याच मैदानावर ‘छोडो भारत’ लढ्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता करताना, स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती पुढे नेण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे बुधवारी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. ‘भारत छोडो’ लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ साजरा करण्याआधी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकापासून आॅगस्ट क्रांती मैदानापर्यंत मूक मिरवणूक काढण्यात आली. तटकरे म्हणाले की, निरपेक्षतेचा विचार दृढ करायला हवा. डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आदिवासी व शोषित समाजाच्या कल्याणासाठी काम करावे लागेल. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर , माजी अर्थमंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते आदींनी भाषणातून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते.

युद्धाचा उन्माद घातक - भालचंद्र नेमाडे
मुंबई : शत्रूला मारणे, म्हणजे हा एक उन्मादच. युद्धाचा उन्माद हा अत्यंत घातक आहे. त्याचा तरुण पिढीने विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भालचंद्र नेमाडे यांनी केले. ‘छोडो भारत’ चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टÑ सेवा दलाने आयोजित केलेल्या अभिवादन रॅली वेळी ते बोलत होते.

Web Title:  Need to take the memory of freedom struggle - Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.