समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचं - राजेंद्र दर्डा

By admin | Published: July 11, 2017 03:15 PM2017-07-11T15:15:59+5:302017-07-11T16:36:41+5:30

जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज लोकमत वॉटर समिट २०१७चे आयोजन करण्यात आले आहे.

Need water for drinking water - Rajendra Darda | समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचं - राजेंद्र दर्डा

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचं - राजेंद्र दर्डा

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज लोकमत वॉटर समिट २०१७चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकमतच्या वाचकांचे आभार मानले. जलदूतांच्या जलकथांना राज्यातील लोकमतच्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जलसंधारणाची राज्याला, मराठवाड्यासारख्या भागांना अतीव गरज आहे. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचे आहे, इस्रायलचे उदाहरण जगाने समोर ठेवावे. जलयुक्त शिवारचे यश महत्त्वाचे, पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणावा. यावेळी बोलताना त्यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या कामाचा गौरवही केला.
जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन झाले. अंधेरी पूर्वेकडील आयटीसी मराठा येथे दुपारी १२.३० वाजता वॉटर समिटला प्रारंभ झाला. यावेळी जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह उपस्थित होते.
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना भारतातील पाण्याची स्थिती आण जलयुक्त काम का गरजेच आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगातील पाण्याची उपलब्धता दोन हजार वर्षांपूर्वी जेवढी होती, तेवढीच आजही आहे, पण लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे पाणी नियोजन महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही.

(समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचं - राजेंद्र दर्डा)
(जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकमत - राम शिंदे)
(शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध - संजीव मेहता)
(राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कणीण - राजेंद्र सिंह)

Web Title: Need water for drinking water - Rajendra Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.