सुई, काट्यावर रेकॉड वाजविणारा अवलिया
By Admin | Published: August 25, 2016 02:51 PM2016-08-25T14:51:09+5:302016-08-25T14:51:09+5:30
लाऊडस्पीकरवर गाणे वाजविण्यासाठी वापरले जाणारे डिस्क रेकॉर्ड हे विजेविना टाचणी किंवा चक्क बाभळीच्या काट्यावर चालवून गाणे वाजविण्याचा अविष्कार वाशिम तालुक्यातील इसमाने केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २५ - २० व्या शतकाच्या मध्यंतराच्या काळात लाऊडस्पीकरवर गाणे वाजविण्यासाठी वापरले जाणारे डिस्क रेकॉर्ड हे विजेविना टाचणी किंवा चक्क बाभळीच्या काट्यावर चालवून गाणे वाजविण्याचा अविष्कार वाशिम तालुक्यातील केनवड येथील गजानन केशव खराटे या इसमाने केला आहे.
गजानन खराटे हे केनवड येथील एका गरीब कुटूंबातील सदस्य. केनवड येथेच त्यांच्या वडिलांचे एक छोटेशे उपाहारगृह होते. त्या उपाहारगृहाच्या बाजूला एक रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. गजानन खराटे सकाळी शाळेतून परतल्यानंतर आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी दिवसभर हॉटेलवर थांबायचे. या दरम्यान, ते शेजारच्या रेडिओ दुरुस्तीच्या दुकानात जायचे. त्या ठिकाणी रेडिओ किंवा डिस्क रेकॉड दुरुस्तीची कामे करणाºया व्यक्तीच्या कामाविषयी कुतूहल असल्यामुळे तेथे जाणारे गजानन खराटे यांना रेडिओ दुरुस्ती आणि अशीच कामे करण्याचा छंद जडला. त्या ठिकाणी राहून वेगवेगळे प्रयोग करतानाच त्यांनी विजेवर चालणारे प्राचीन डिस्क रेकॉर्ड किंवा टर्नटेबल विना विजेवरही चालविण्याचा प्रयोग केला. थर्मोकोलच्या एका जाड कागदाला सुई टोचून ती सुई डिस्क रेकॉर्डवर ठेवायची आणि रेकॉड फिरविले, की त्यामधून गाण्याचा आवाज येतो. हा अफलातून प्रयोग त्यांनी यशस्वी केला. गजानन खराटे यांनी त्याशिवाय अनेक प्रयोग केले आहेत. केवळ १२ वा वर्ग उत्तीर्ण असणाºया या एक ध्वनी नियंत्रक आणि प्रक्षेपक प्लेट विकसीत करताना केनवड येथील एक किलोमीटर अंतरात सर्व रेडिओ स्टेशनच निष्क्रीय करून स्वत:चे स्वतंत्र रेडिओ स्टेशनवर गाणे ऐकविण्याचा कारनामाही केला. त्याशिवाय त्यांनी टाळीने विजेची उपकरणे चालू-बंद करण्याचा प्रयोगही यशस्वी केला.