"मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं...", निलम गोऱ्हेंनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं!; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:00 PM2022-08-18T14:00:50+5:302022-08-18T14:02:14+5:30

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि मंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे.

Neelam Gorhe slams minister gulabrao patil in the vidhan parishad | "मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं...", निलम गोऱ्हेंनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं!; नेमकं काय घडलं?

"मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं...", निलम गोऱ्हेंनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं!; नेमकं काय घडलं?

Next

मुंबई-

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि मंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. विधान परिषदेत आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर उपसभापती निलम गोऱ्हे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. "मंत्री तुम्ही तुमच्या घरी", अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं आहे. तसंच सभागृहात बोलण्याच्या आक्रमक पद्धतीवरुनही त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना ताकीद दिली. 

पांढरी दाढी देशात, काळी दाढी राज्यात अन् भाषणावर GST; छगन भुजबळांची विधानसभेत तुफान बॅटिंग!

शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जुंपली. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना खाली बसण्यासाठी वारंवार निर्देश दिले तरी ते खाली बसले नाहीत. छातीवर हात बडवून काय बोलता?, अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी गुलाबरावांना सुनावलं

नेमकं काय घडलं?
शिक्षकांच्या बाबतीतील एका प्रश्नावरुन गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गदारोळादरम्यान मंत्री गुलाबराव यांना वारंवार खाली बसण्याची विनंती करत होत्या. "गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? परत परत सभापतींना सांगावं लागतंय. चौकात आहात का तुम्ही?", असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. यावर गुलाबराव पाटील यांनी "मी मंत्री आहे", असं म्हटलं. यावरुन निलम गोऱ्हे आणखी संतापल्या आणि "मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा", असं सुनावलं. 

Web Title: Neelam Gorhe slams minister gulabrao patil in the vidhan parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.