नीलय नाईक भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 01:43 AM2016-10-28T01:43:35+5:302016-10-28T01:43:35+5:30

पुसदच्या नाईक घराण्यातील नीलय नाईक यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेले

Neelay Naik BJP | नीलय नाईक भाजपात

नीलय नाईक भाजपात

googlenewsNext

मुंबई : पुसदच्या नाईक घराण्यातील नीलय नाईक यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेले नीलय हे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुतणे आहेत.
नीलय यांनी अलिकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाजपा प्रवेशाला हिरवा झेंडा दाखविला. मुख्यमंत्र्यांनी आज प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दानवे यांच्या उपस्थितीत नीलय यांनी भाजपात प्रवेश घेतला. नीलय हे १९९२ ते ९७ पर्यंत यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. वसंतराव नाईक प्रतिष्ठान; मुंबईचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. काका मनोहर नाईक यांच्याशी त्यांचे राजकीय संबंध नेहमीच ताणलेले राहिले. नीलय यांना प्रवेश देऊन भाजपाने पहिल्यांदाच नाईक घराण्यात शिरकाव केला आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Neelay Naik BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.