नीरा-बारामती रस्ता की मृत्यूचा सापळा ?

By Admin | Published: April 7, 2017 01:10 AM2017-04-07T01:10:02+5:302017-04-07T01:10:02+5:30

नीरा-बारामती रस्तावर वाहतूक वाढल्याने अनेक ठिकाणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

Neera-Baramati road or the trap of death? | नीरा-बारामती रस्ता की मृत्यूचा सापळा ?

नीरा-बारामती रस्ता की मृत्यूचा सापळा ?

googlenewsNext

सोमेश्वरनगर : नीरा-बारामती रस्तावर वाहतूक वाढल्याने अनेक ठिकाणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यात आलेले वृक्ष, धोकादायक वळणे, चढ-उतार व रस्त्यालगतची वठलेली झाडे, हे नेहमीच अपघाताला आमंत्रण देत असतात. अनेक वेळा अपघात होऊनही बांधकाम विभाग मात्र याकडे डोळेझाक करत आहे.
काही दिवसांपूर्वी रस्ता वाढला मात्र अपघात काही कमी झाले नाहीत. त्यामुळे निरा बारामती रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे मृत्युला आमंत्रण देण्यासारखे आहे. अनेक ठिकाणचे पुल अजूनही त्याच
स्थितीत आहेत.
रस्त्यालगतची अनेक झाडे ही जळाली असून ती कोणत्याही क्षणी वाहनचालकाच्या जिवावर बेतू शकतात. तसेच मागील काही दिवसात रस्त्याचे रूंदीकरण झाले मात्र हे रूंदीकरण करत असताना रस्त्यालगतची झाडे ही रस्त्यामध्ये आली आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण अजून वाढले. तसेच अनेक ठिकाणी साईट पट्ट्या खचल्या आहेत. निरा बारामती रस्त्यावरील कोऱ्हाळे जवळीत सर्वांत धोकादायक असे वळण म्हणून कठीण पुलाला ओळखले जाते. काही दिवसांपुर्वीच याठिकाणी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र नीरा डाव्या कालव्यावरील पुल मात्र अरूंद आणि जुनाच आहे. तो बदलण्याची तसदी घेतलेली दिसत नाही.
या ठिकाणी अनेक वेळा एसटी बस व खाजगी वाहने पलटी झाल्याचे प्रकार घडले आहेत. बारामती वरून निरेकडे जात असताना या पुलाजवळ आल्यास समोरील रस्ताच दिसत नाही. त्यामुळे वळायचे कुठे हा प्रश्न वाहनचालकांना पडतो. रोजचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हा रस्ता नित्याचा बनला आहे. मात्र परगावावरून येणारे वाहनचालक हमखास या ठिकाणी फसतात. रात्रीच्या वेळी परगावातील वाहनांना या ठिकाणी हमखास अपघाताला समोरे जावे लागते. (वार्ताहर)
>अनेक ठिकाणी वठलेले वृक्ष
नीरेपासून ते बारामतीपर्यंत रस्त्यालगतचे अनेक वृक्ष पुर्णत; वठून गेले. पूर्ण वृक्षच वाळला असून त्याला वाळवी लागली आहे. तो कोणत्याही क्षणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोसळू शकतात. वादळी वाऱ्यात हेच वृक्ष कोलमडून अनेक तास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मात्र संबंधित विभाग याकडे लक्षच देत नाही. त्याच बरोबर जेव्हा काही दिवसांपूर्वी नीरा ते कोऱ्हाळे या दरम्यान रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले त्यावेळी संबंधित ठेकेदाराने रस्ता मोठमोठया वृक्षांच्या बुंध्यापर्यंत केला काही वृक्ष तर अक्षरश: रस्त्यामध्येच आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
>पणदरे खिंडीतील चढण काढण्याची मागणी
पणदरे खिंड-नीरा बारामती रोड जसा अस्तित्वात आला तेव्हापासून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पणदरे खिंड चांगलीच परिचित आहे. काही वर्षांपूर्वी रात्री नऊनंतर या खिंडीत प्रवाशांना अडवून लूटमारीचे प्रकार घडत होते. हे प्रकार अलीकडे कमी झाले आहे. मात्र या ठिकाणी दोन्हीकडील वाहनांना अजूनही डोंगर चढून रस्ता पार करावा लागतो. तसेच याठिकाणी अनेक वेडीवाकडे वळणे असून अनेक अपघातही झाले आहेत. संबंधित विभाग मात्र हा कडे लक्ष देत नाही. या ठिकाणाचा डोंगरावरील चढ त्वरित काढून टाकण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

Web Title: Neera-Baramati road or the trap of death?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.