'तो' तर फडणवीसांचा सचिन वाझे; नीरज गुंडेचं नाव घेत मलिकांचा सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 10:06 AM2021-11-01T10:06:48+5:302021-11-01T10:10:11+5:30

अल्पसंख्याक मंत्री नवाब मविक यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

neeraj gunde was devendra fadnavis sachin waze ncp leader nawab malik makes serious allegations | 'तो' तर फडणवीसांचा सचिन वाझे; नीरज गुंडेचं नाव घेत मलिकांचा सनसनाटी आरोप

'तो' तर फडणवीसांचा सचिन वाझे; नीरज गुंडेचं नाव घेत मलिकांचा सनसनाटी आरोप

Next

मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता त्यांचा मोर्चा भारतीय जनता पक्षाकडे वळवला आहे. अमृता फडणवीस यांचा ड्रग पेडलरसोबतचा फोटो ट्विट करत मलिक यांनी खळबळ उडवून दिली. अमृता यांनी गायलेल्या रिव्हर अँथमला अर्थसहाय्य करणारी व्यक्ती ड्रग पेडलर असल्याचा दावा करत मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर सनसनाटी आरोप केले.

जयदीप राणा सध्या तुरुंगात आहे. ड्रग तस्करीप्रकरणी तो शिक्षा भोगत आहे. त्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी उत्तम संबंध आहेत. फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी राज्यात भाजपची सत्ता असताना रिव्हर अँथम गायलं. त्यात देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दिसले होते. त्या अँथमला अर्थसहाय्य राणा यांनीच केलं होतं, असा दावा मलिक यांनी केला. राज्यात सुरू असलेला ड्रग्जचा धंदा फडणवीस यांच्याच इशाऱ्यावरून सुरू असल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडे दलाल म्हणून काम करायचा. अनेक बदल्या त्याच्या सांगण्यावरून झाल्या. मंत्रालयात, वर्षावर त्याचा वावर होता. त्याला सगळीकडे प्रवेश होता. नीरज गुंडे हा फडणवीसांचा सचिन वाझे होता, असा खळबळजनक आरोपही मलिक यांनी केला. फडणवीस यांचा दूत म्हणून गुंडे काम करायचा. शिवसेना-भाजपचे संबंध ताणले गेल्यावर, सरकारमध्ये तणाव निर्माण झाल्यावर गुंडे अनेकदा फडणवीसांचे निरोप घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जायचा, असं मलिक यांनी सांगितलं.

Web Title: neeraj gunde was devendra fadnavis sachin waze ncp leader nawab malik makes serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.