‘समाजकल्याण’च्या वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजीपणा

By Admin | Published: June 22, 2017 04:17 PM2017-06-22T16:17:30+5:302017-06-22T16:17:30+5:30

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 22 - समाजकल्याण विभागांतर्गत येणा-या वसतिगृह प्रशासनाने मुदतबाह्य औषधी वाशिम-शेलुबाजार रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या ‘खणटी’मध्ये ...

Negligence of the administration of 'Social Welfare' | ‘समाजकल्याण’च्या वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजीपणा

‘समाजकल्याण’च्या वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजीपणा

Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 22 - समाजकल्याण विभागांतर्गत येणा-या वसतिगृह प्रशासनाने मुदतबाह्य औषधी वाशिम-शेलुबाजार रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या ‘खणटी’मध्ये फेकून दिल्याचा प्रकार समोर आला. 
 
समाजकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणा-या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी ‘टॉनिक’ची औषधी पुरविली जाते. विद्यार्थी संख्येनुसार या औषधीचा पुरवठा होत असून, नियमितपणे विद्यार्थ्यांना सदर औषधी देणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी सदर औषधी विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे बोलले जाते. मुदत संपल्यानंतर हीच औषधी रफादफा करण्याचे प्रकारही वसतिगृह प्रशासनातर्फे केले जातात. असाच प्रकार उघडकीस आला असून, वाशिम शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेलुबाजार मार्गालगतच्या एका खड्ड्यात मुदतबाह्य औषधीच्या शेकडो ‘बॉटल्स’ आढळून आल्या आहेत. या बॉटलवर ‘सोशल जस्टिस डिपार्टमेंट होस्टेल - नॉट फॉर सेल’ असे स्पष्ट लिहिलेले असल्याने सदर मुदतबाह्य औषधी समाजकल्याण विभागाच्या कुण्यातरी वसतिगृहातील असल्याची दाट शक्यता आहे. या औषधीची मुदत जून 2015 मध्ये संपलेली असताना, जून 2017 मध्ये ही औषधी फेकून का देण्यात आली याची चौकशी करणे गरजेचे आहे. 
 
दरम्यान, यासंदर्भात समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक मुसळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की या प्रकाराची माहिती घेतली जाईल. मुदतबाह्य औषधी आढळणे हा गंभीर प्रकार असून या प्रकरणी कारवाई केली जाईल. दोषी आढळणाºयांची गय केली जाणार नाही, असे मुसळे यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ-
 
 
https://www.dailymotion.com/video/x845699

Web Title: Negligence of the administration of 'Social Welfare'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.