नेरळ-माथेरान घाटात कोसळली दरड

By admin | Published: June 29, 2017 01:44 AM2017-06-29T01:44:16+5:302017-06-29T01:44:16+5:30

पावसाने बुधवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावल्याने नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली. नांगरखिंडीत कोसळलेल्या या लहानशा दरडीने सकाळच्या वेळी दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

Neral-Matheran Ghat collapsed in the valley | नेरळ-माथेरान घाटात कोसळली दरड

नेरळ-माथेरान घाटात कोसळली दरड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : पावसाने बुधवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावल्याने नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली. नांगरखिंडीत कोसळलेल्या या लहानशा दरडीने सकाळच्या वेळी दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
बुधवार, २८ जून रोजी पहाटे घाटात नांगरखिंडीत एक लहानशी दरड कोसळून रस्त्यावर आली, त्यामुळे त्या दरडीमुळे रस्त्यावर आलेली माती आणि दगड, झाडे यांच्यामुळे रस्त्याची वाहतूक पहाटेपासून बंद होती. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा सुरू असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या भागात वाहतूककोंडी झाली होती. कोणत्याही यंत्रणेकडून जेसीबी मशिन उपलब्ध होत नसल्याने शेवटी स्थानिक
तरु णांनी पुढे येऊन रस्त्यावरील दरड बाजूला केली आणि रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली. दोन तासांनंतर वाहतूक सुरू होऊ शकली. या रस्त्याचे नव्याने रु ंदीकरण केले जात असून, त्यांची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने घेतली आहे. त्यासाठी ३० कोटी रु पयांची मोठी तरतूद केलेली असताना प्राधिकरणाने माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग लक्षात घेता, पावसाळ्यातील चार महिने अत्यावश्यक सुविधा म्हणून तत्पर राहण्याची मागणी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केली.

Web Title: Neral-Matheran Ghat collapsed in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.