पोषण आहारात आढळली उंदराची विष्टा
By Admin | Published: July 14, 2016 07:04 PM2016-07-14T19:04:21+5:302016-07-14T19:04:21+5:30
तालुक्यातील डोमरूळ येथील अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात उंदराची विष्टा आढळल्याचा प्रकार १४ जुलै रोजी उघडकीस आला आहे.
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १४ - तालुक्यातील डोमरूळ येथील अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात उंदराची विष्टा आढळल्याचा प्रकार १४ जुलै रोजी उघडकीस आला आहे.
यासंदर्भात पालक विश्वदिप पडोळ यांनी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
डोमरूळ येथील अंगणवाडीमध्ये १४ जुलै रोजी तांदळाच्या खिचडीचा पोषण आहार वाटप करण्यात आला. यावेळी अश्वमेध विश्वदिप पडोळ हा मुलगा स्वत: च्या डब्यात पोषण आहार घेवून घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यांने खिचडी खाण्यासाठी तो डबा उघडला असता, पोषण आहारामध्ये उंदराची विष्टा असल्याचा प्रकार पालक विश्वदिप पडोळ यांच्या लक्षात आला. तेंव्हा त्यांनी तो पोषण आहार अंणगावाडी सेविकेच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सदर पोषण आहार दाखवून यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली. अंगणावाडीमध्ये अशा प्र्रकारच्या निकृष्ट प्रकारच्या पोषण
आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.