निव्वळ घोषणा, ठोस काहीच नाही
By admin | Published: December 13, 2014 02:36 AM2014-12-13T02:36:51+5:302014-12-13T02:36:51+5:30
मोठ-मोठी आश्वासने देऊन केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर आलेल्या भाजप सरकाने जनतेची निराशा केली आहे.
Next
नागपूर : मोठ-मोठी आश्वासने देऊन केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर आलेल्या भाजप सरकाने जनतेची निराशा केली आहे. आघाडी शासनाच्या काळातील योजनेत किरकोळ बदल करून त्या नवीन गोंडस नावाखाली नव्याने सादर करून फित कापण्याचा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे. योजनांच्या नावावर निव्वळ घोषणा केल्या जात आहेत. त्यात ठोस उपाययोजना काहीच नाही, स्वच्छतेच्या नावावर एका ठिकाणचा कचरा, दुस:या ठिकाणी सरकवला जात आहे, परंतु कचरा, घनकच:याबाबत काहीच ठोस कार्यक्रम नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत सत्तापक्षावर चौफेर हल्ला चढविला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीलाच खेद व्यक्त करीत राज्यपालांच्या अभिभाषणाला आपला पाठिंबा दर्शविण्यास असमर्थता व्यक्त केली.
तिजोरी खाली असल्याचा बहाणा करीत विकास कामावर 4क् टक्के कपात लावण्याचे सांगितले जात आहे, ते योग्य नाही. राज्यातील विकास कामे आम्ही थांबू देणार नाही. जनतेच्या हिताविरुद्ध काम होत असेल तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्त भागातील शेतक:यांमध्ये भेदभाव
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतक:यांसाठी पॅकेज जाहीर केले, परंतु त्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष शेतक:यांना रोख किती देणार, याची माहिती कुठेच दिलेली नाही. पहिल्यांदाच पॅकेज देत असताना शेतक:यांमध्ये भेदभाव करण्यात आला असल्याची टीका सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.