सट्ट्याचे देशभरात जाळे

By admin | Published: March 21, 2016 03:24 AM2016-03-21T03:24:24+5:302016-03-21T03:24:24+5:30

पोलिसांकडून सट्टेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी आकोटसारख्या छोट्या शहरातून सट्ट्याचे जाळे देशभरात विणले गेले असल्याची माहिती

Netting network across the country | सट्ट्याचे देशभरात जाळे

सट्ट्याचे देशभरात जाळे

Next

अकोला : पोलिसांकडून सट्टेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी आकोटसारख्या छोट्या शहरातून सट्ट्याचे जाळे देशभरात विणले गेले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सट्टा‘नरेश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील बुकीने स्वत:चा अत्याधुनिक अड्डाच तयार केला असून, हॉटलाइन आणि लॅपटॉपसह सर्वच सोयी येथे उपलब्ध असतात.
तब्बल २४ मोबाइल फोनच्या माध्यमातून कोलकातापासून ते मुंबईपर्यंतच्या सट्टेबाजांशी येथूनच संपर्क साधला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेवर अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असून, शहरात ‘जय माता दी’, ‘बालाजी’ या टोपण नावाने बुकींच्या टोळ्याच सक्रिय झाल्या आहेत. बुकींच्या टोळ्या क्रिकेट, फुटबॉल, हॉकीसह इतरही सामन्यांवर सट्टा लावतात. या बुकींची उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
हॉटलाइनचीही सुविधा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुकींकडे स्वत:ची हॉटलाइन असते. त्याचा दिवसाला खर्च २० ते २५ लाख रुपये असतो. मैदानावर प्रत्यक्ष होणारा सामना आणि टेलिव्हिजनवरील प्रक्षेपणात अंतर असते.
बुकींना मात्र हॉटलाइनच्या माध्यमातून मैदानात रंगलेल्या सामन्याची प्रत्येक घडामोड त्याचक्षणी समजते. बुकींना सामन्याच्या घडामोडी टेलिव्हिजनवर सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा आधीच समजत असल्याने, ते भाव कमी-जास्त करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Netting network across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.