कधीच काश्मीरमध्ये न राहिलेले देतायत काश्मिरी पंडितांसाठी लढा - नसीरुद्दीन शहांचा अनुपम खेरना टोला
By admin | Published: May 28, 2016 10:19 AM2016-05-28T10:19:57+5:302016-05-28T11:48:47+5:30
जी व्यक्ती (अनुपम खेर) कधीच काश्मिरमध्ये राहिलेली नाही, तीच व्यक्ती काश्मिरी पंडितांसाठी लढताना दिसत आहे. आता अचानक ती व्यक्ती 'विस्थापित' बनली आहे, अशी टीका नसिरुद्दीन शहांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी त्यांचे सहकलाकार व अभिनेता अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधल्याने त्यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहे. अनुपम खेर हे काश्मिरी पंडितांसाठी लढा देताना, खो-यातील त्यांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवताना दिसतात, त्याच मुद्यावरून शहा यांनी खेर यांच्यावर टीका केली आहे. ' जे लोक व्यक्ती (खेर) कधीच काश्मिरमध्ये राहिले नाहीत, तेच आता काश्मिरी पंडितांसाठी लढा देताना दिसत आहे. आता अचानक ती व्यक्ती 'विस्थापित' बनली आहे' अशा शब्दांत नसीरुद्दीन शहा यांनी खेर यांच्यावर निशाणा साधला आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलतान शहा यांनी खेर यांच्यावर टीका केली तसेच केंद्र सरकारबद्दलही टिपण्णी केली.
Shah Saab ki Jai Ho. By that logic NRI's should not think about India at all.:) Naseeruddin Shah on Anupam Kher https://t.co/UtQrtZ66we
— Anupam Kher (@AnupamPkher) May 27, 2016