७.५ अश्वशक्तीचे नवीन ७५०० सौर कृषी पंप आस्थापित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 09:34 AM2020-09-28T09:34:30+5:302020-09-28T09:34:43+5:30
महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषी पंपांसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अकोला : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७,५०० नवीन सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषी पंपांसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता राज्य शासनाने १ लाख पारेषण विरहित सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’ सुरू केली आहे. महावितरणच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात २५ हजार सौर कृषी पंपांच्या आस्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. आता दुसºया व तिसºया टप्प्यात आणखी ७५ हजार सौर कृषी पंपांच्या आस्थापनेचे उद्दिष्ट आहे. तथापि, शेतकºयांची मागणी लक्षात घेता ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी या योजनेच्या टप्पा २ व ३ अंतर्गत ७.५ अश्वशक्तीचे ७,५०० सौर कृषी पंप आस्थापित करण्याकरिता मंजुरी दिलेली आहे.
महावितरणकडून वेबपोर्टलद्वारे ७.५ अश्वशक्तीच्या सौर कृषी पंपांच्या आस्थापनेसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, ज्या गावांची सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपशाची स्थिती ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषी पंप देण्यात येणार आहे; मात्र कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये ७.५ अश्वशक्तीचे सौर पंप देण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी शेतकºयांनी महावितरणच्या ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल/२ङ्म’ं१/ या वेबपोर्टलला भेट देण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या योजनेसंबंधी सर्व माहिती या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.
केवळ १० टक्के लाभार्थी हिस्सा
सदर योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थींकडून १० टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थींकरिता ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थीस भरणे आवश्यक आहे. ७.५ अश्वशक्ती सौर कृषी पंपाची ८.९ टक्के जीएसटीसह किंमत ३,३४,५५० असून, खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना १० टक्के हिस्सा म्हणून ३३,४५५ रुपये केवळ तर अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थींना ५ टक्के हिस्सा म्हणून १६,७२८ रुपये केवळ भरणा करावा लागेल.