नवीन प्रशासकीय भवन निर्माण होणार

By admin | Published: September 1, 2015 01:06 AM2015-09-01T01:06:59+5:302015-09-01T01:06:59+5:30

सध्या पालिकेच्या मुख्यालयातील मर्यादित जागेमुळे दैनंदिन कारभारात अडचण निर्माण होत असल्याने वाढलेल्या कारभाराच्या निपटाऱ्यासाठी प्रशासन लवकरच

A new administrative building will be built | नवीन प्रशासकीय भवन निर्माण होणार

नवीन प्रशासकीय भवन निर्माण होणार

Next

राजू काळे, भार्इंदर
सध्या पालिकेच्या मुख्यालयातील मर्यादित जागेमुळे दैनंदिन कारभारात अडचण निर्माण होत असल्याने वाढलेल्या कारभाराच्या निपटाऱ्यासाठी प्रशासन लवकरच नवीन प्रशासकीय भवनाची निर्मिती करणार आहे.
पालिकेची २०१२ मधील सार्वत्रिक निवडणूक पॅनल पद्धतीवर लढली गेली. या पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक निवडून आल्याने ४७ प्रभागांत नगरसेवकांची संख्या ९५ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या ४ प्रभाग समित्यांच्या संख्या ६ वर आणली आहे. वाढत्या लोकवस्त्यांमुळे पालिकेच्या दैनंदिन कारभारावर ताण पडत आहे. शहरात नवनवीन प्रकल्प राबविण्यात येत असून नवीन शासकीय गृहसंकुलांचीदेखील भर पडत आहे. तसेच मुख्यालयातील विविध विभागांच्या जागा अपुऱ्या पडू लागल्या असल्या तरी मुख्यालयाचे विस्तारीकरण प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. कारण, मुख्यालयाची जागा सीआरझेडबाधित असून तिचा विस्तार पर्यावरण विभागाच्या परवानगीनुसार करता येणार नाही. त्यामुळे मुख्यालयाच्या विस्तारीकरणाखेरीज नवीन प्रशासकीय भवनच निर्माण केल्यास पालिकेच्या दैनंदिन कारभाराला पुरेशी व प्रशस्त जागा उपलब्ध होण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याबाबत, नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी सांगितले की, प्रशासन नवीन प्रशासकीय भवन निर्माण करणारच आहे. परंतु, सध्या ही बाब प्राथमिक स्तरावर असून त्याला लवकरच मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे.

Web Title: A new administrative building will be built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.