गावांमध्ये फोफावतेय नवे ‘भाजपा गवत’!, ‘चिबुक काट्या’ला नवी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 07:09 AM2017-10-23T07:09:59+5:302017-10-23T07:10:17+5:30
यंदा उशिरापर्यंत झालेल्या पावसाने अनेक गावांमध्ये मोकळ्या जागेत एक नव्या प्रकारचे गवत फोफावले आहे. ‘अल्टरनेनथेरा चेसीलिज’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या गवताचे मूळ परदेशी आहे व शेतक-यांना ‘चिबुक काटा’ या नावाने या गवताची ओळख आहे.
- भाऊसाहेब येवले
राहुरी (जि. अहमदनगर) : यंदा उशिरापर्यंत झालेल्या पावसाने अनेक गावांमध्ये मोकळ्या जागेत एक नव्या प्रकारचे गवत फोफावले आहे. ‘अल्टरनेनथेरा चेसीलिज’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या गवताचे मूळ परदेशी आहे व शेतक-यांना ‘चिबुक काटा’ या नावाने या गवताची ओळख आहे. देशातील भाजपाचा प्रसार आणि या नव्या गवताचा प्रसार समकालीन असल्याने ‘भाजपा गवत’ म्हणूनही या गवताची ओळख निर्माण झाली आहे़
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अमेरिकन गव्हातून ‘गाजर गवता’चे बी भारतात आले होते़ नंतर ते एवढे फोफावले की, कालांतराने ते ‘काँग्रेस गवत’ म्हणून ओळखले जाऊ लागले़ त्याचप्रमाणे यंदा ‘अल्टरनेनथेरा चेसीलिज’ गवताचे उदंड पीक आले आहे़ त्यामुळे जनावरांना सध्या मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. या गवताला तेलुगूमध्ये ‘पान्नागणती अकू’ तर तमीळमध्ये ‘पोन्नागनी’ म्हणून ओळखले जाते. पांढरी फुले असलेले, जमिनीला समांतर वाढणारे, वेगळ्या फांद्यांचे व हिरवेगार गवत पौष्टिक चारा म्हणून जनावरांना खायला दिले जात आहे. चाºयामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, खनिज यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ विशेषत: पावसाळ्यात हे गवत मोठ्या प्रमाणावर वाढते, असा शेतकºयांचा अनुभव आहे़ हिवाळा व उन्हाळ्यात गवतांचे प्रमाण कमी असते़
>‘अल्टरनेनथेरा’
ही वनस्पती परदेशातील आहे़ पशुखाद्यामध्येही तिचा वापर केला जातोे़ केशवर्धक तेल, काजळ इत्यादीही त्यापासून तयार होते़ शंभर गॅ्रममध्ये ८० टक्के पाण्याचे प्रमाण असते़ प्रोटीन, कार्बोेहायड्रेट, खनिज यांचे प्रमाण अधिक आहे़ जनावरांचे दूध वाढण्यास
उपयुक्त आहे़
- प्रा़ अशोक अभंग, वनस्पती शास्त्र विभाग, कृषी कॉलेज, राहुरी
>चिबुक काटा हे गवत पावसाळ्यात सर्वत्र आढळत असल्याने पौष्टिक चारा म्हणून मिळेल तेथून आणतो़ कापण्यास सोपे आहे व जनावरेही आवडीने खात असल्याने गो-पालक या गवतावर खूश आहेत़ वर्षभर हा चारा उपलब्ध झाला तर फायदेशीर ठरेल़ त्यादृृष्टिकोनातून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधन करणे गरजेचे आहे़
- राजेंद्र हापसे/सोमनाथ वाघ, गोपालक