नव्या बसेसचा ‘धडाका’
By admin | Published: August 27, 2015 03:10 AM2015-08-27T03:10:30+5:302015-08-27T03:10:30+5:30
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नव्या बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २0१६ पर्यंत १,८00 बसेसची बांधणी होऊन त्या ताफ्यात आणल्या जाणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.
मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नव्या बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २0१६ पर्यंत १,८00 बसेसची बांधणी होऊन त्या ताफ्यात आणल्या जाणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाकडून प्रत्येक वर्षी नवीन बसेसची बांधणी केली जाते. पुण्यातील दापोडी, औरंगाबादमधील चिखलठाणा, नागपूरमधील हिंगणा या तीन ठिकाणी मध्यवर्ती वर्कशॉप असून निमआराम, शहरी व साध्या बसेसची बांधणी करून त्या नव्याने आणल्या जातात. मात्र आता त्याची संख्या आणखी वाढवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, तब्बल १,८00 बसेसची बांधणी करून त्या ताफ्यात आणल्या जातील, असे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. या नवीन बसेस २0१६ च्या मार्च महिन्यापर्यंत येतील.
त्याचप्रमाणे एसटीने ३९ आसन क्षमतेच्या रिअर एअर सस्पेन्शन प्रणाली असलेल्या बसेस चालनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८00 निमआराम रिअर एअर सस्पेन्शन प्रणाली चालनात आल्या आहेत. तर निमआराम बसेसमधील सीटमध्ये बदल करीत त्या पुशबॅक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)
१२८ निमआराम बसेस
२0१४-१५ या वर्षात ६७६ नवीन बसेस एसटी महामंडळाला उपलब्ध झाल्या होत्या. यापैकी ५४८ परिवर्तन व शहरी आणि १२८ निमआराम बसेसचा समावेश होता.