नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
By admin | Published: December 6, 2014 03:36 PM2014-12-06T15:36:40+5:302014-12-06T15:59:30+5:30
विधानभवनात शुक्रवारी शिवसेनेच्या व भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - विधानभवनात शुक्रवारी शिवसेनेच्या व भाजपाच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजपा- शिवसेना युती या विधानसभा निवडणुकीपूर्वी संपुष्टात आली होती. मात्र सलग तीन आठवडे विरोधी पक्षाची भूमिका निभावणारी शिवसेना भाजपासोबत युती करत शुक्रवारी सत्तेत सहभागी झाली. भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सेना- भाजपा मिळून२० मंत्र्यांचा शपथविधी विधिमंडळ प्रांगणात पार पडला.
खातेवाटप खालीलप्रमाणे :
कॅबिनेट मंत्री
भाजपा - गिरीश बापट - अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन, संसदीय कामकाज, गिरीश महाजन - जलसंपदा, चंद्रशेखर बावनकुळे - ऊर्जा, बबनराव लोणीकर - पाणीपुरवठा व स्वच्छता, राजकुमार बडोले - सामाजिक न्याय,
शिवसेना
दिवाकर रावते - परिवहन, सुभाष देसाई - उद्योग, रामदास कदम - पर्यावरण, एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), डॉ. दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण
राज्यमंत्री :
भाजपा - प्रा. राम शिंदे - गृह, पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन, विजय देशमुख - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग, राजे अंबरीश अत्राम - आदिवासी विकास, डॉ. रणजित पाटील - विधी व न्याय, प्रवीण पोटे-पाटील - उद्योग व खणीकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम
शिवसेना - संजय राठोड - महसूल, दादा भुसे- सहकार, विजय शिवतारे - जलसंपदा, जलसंधारण, दीपक केसरकर - वित्त, ग्रामविकास, रवींद्र वायकर - गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण