राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी सुरू होणार नवीन महाविद्यालये 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:08 AM2023-08-31T02:08:28+5:302023-08-31T05:48:46+5:30

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.

New colleges will be started in 1 thousand 499 places in the state | राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी सुरू होणार नवीन महाविद्यालये 

राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी सुरू होणार नवीन महाविद्यालये 

googlenewsNext

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरू करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यास बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरू करता येणार आहेत.  

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

बृहत आराखड्यावरही चर्चा
विद्यापीठाने दर पाच वर्षांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक सम्यक योजनेस महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची मान्यता घेण्यात येते. त्यानुसार सम्यक योजनेशी अनुरूप  २०२४-२५ च्या वार्षिक योजना प्रस्ताव आणि सन २०२४ ते २९ या पंचवार्षिक योजनेच्या बृहत आराखड्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

२०२४ ते २०२९ या पंचवार्षिक स्थळबिंदू आराखड्यामध्ये १५३७ नवीन प्रस्तावित ठिकाणे होती, त्यापैकी १४९९ ठिकाणे पात्र ठरली असून या आराखड्याला मान्यता देण्यात आली. 
२०१९ ते २०२४ या पंचवार्षिक बृहत आराखड्यामध्ये १०५९ स्थळबिंदूंचा समावेश होता. विद्यापीठांकडून ३१९३ नवीन प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आले होते, त्यातील २८१९ स्थळ बिंदूंना राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाने मान्यता दिली होती, गेल्या पाच वर्षांत 
५९३ नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यात आल्या आहेत. 

Web Title: New colleges will be started in 1 thousand 499 places in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.