नव्या रंगातील बेस्ट आजपासून रस्त्यावर
By admin | Published: April 27, 2017 12:19 AM2017-04-27T00:19:01+5:302017-04-27T00:19:01+5:30
जे. जे. इन्स्टिट्यूटच्या विदयार्थ्यांच्या कल्पनेतून बदललेल्या रंगातील बस गुरुवापासून रस्त्यावर धावणार आहे. त्यातील एक साधी बस असून दुसरी वातानुकूलित बस आहे.
मुंबई : जे. जे. इन्स्टिट्यूटच्या विदयार्थ्यांच्या कल्पनेतून बदललेल्या रंगातील बस गुरुवापासून रस्त्यावर धावणार आहे. त्यातील एक साधी बस असून दुसरी वातानुकूलित बस आहे.
सर्व वातानुकूलित बसगाड्या १७ एप्रिलपासून बंद करण्यात आल्या. तोट्यात असल्याने बेस्टने हा अचानक निर्णय घेतल्याने किंग लॉन्गच्या २६६ वातानुकूलित बसगाड्यांचा प्रवास थांबला. त्यामुळे या बसगाड्यांनी नियमित प्रवास करणाऱ्या २५ बसमार्गांवरील प्रवाशांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे वातानुकूलित बस पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न आहे. नवीन रंगसंगती असलेली वातानुकूलित बस ए एस ३१० या मार्गावर पुन्हा सुरु करत आहे.
ही बस वांद्रे स्थानक पूर्व ते डायमंड मार्केट (बीकेसी) दरम्यान धावणार आहे. बेस्टची नवीन साधी बस काही दिवस १११ वर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गेट वे आॅफ इंडिया दरम्यान धावणार आहे. नंतर काही दिवसांनंतर ही बस उपनगरात धावणार आहे. (प्रतिनिधी)