वीज उत्पादनात पारस केंद्राचा नवीन उच्चांक

By admin | Published: May 5, 2016 02:57 AM2016-05-05T02:57:21+5:302016-05-05T03:04:34+5:30

९७ टक्क्यांपेक्षा अधिक भारांक : महानिर्मितीच्या वीज उत्पादन केंद्रांमध्ये अव्वल.

A new high of Parsa power plant in power generation | वीज उत्पादनात पारस केंद्राचा नवीन उच्चांक

वीज उत्पादनात पारस केंद्राचा नवीन उच्चांक

Next

अकोला: महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मितीच्या पारस औष्णिक केंद्राने एप्रिल २0१६ या महिन्यात वीज उत्पादनाचा सर्वोच्च उच्चांक गाठला. या केंद्रातील २५0 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ३ ने १७४.८९७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती आणि ९७.१५५ टक्के भारांक, तर २५0 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ४ ने १७५. ७६९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती आणि ८७.७६९ टक्के भारांक गाठला आहे. यामुळे मे २0१३ मधील पारस वीज केंद्राचा यापूर्वीचा महत्तम वीज उत्पादनाचा व भारांकाचा विक्रम मोडीत निघाला आहे. देशातील विविध केंद्रांमधील गत वर्षभरातील भारांकामध्ये पारस वीज केंद्र अठराव्या स्थानावर असून, महानिर्मितीच्या विविध वीज केंद्रांतील महत्तम भारांकामध्ये प्रथम स्थानावर आहे. वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा, वीज नियामक आयोगाचे निकष, स्वच्छ आणि स्वस्त वीज उत्पादनाचे ध्येय गाठण्याकरिता महानिर्मिती मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली गत वर्षभरापासून पारसचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी नियोजनबद्ध पाऊले उचलली. यामध्ये प्रामुख्याने जास्त उष्मांकाच्या कोळशाचा वापर, कोल मिल्सचे संयोजन, बाष्पक टर्बाइन भागातील देखभाल-दुरुस्तीची कामे, संयंत्रांची शंभर टक्के उपलब्धता, दैनंदिन कामात सुधारणा, वीजनिर्मितीला परिणामकारक ठरणार्‍या तांत्रिक बाबींवर बारकाईने लक्ष दिले. अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, तथा कर्मचार्‍यांमुळे पारस वीज केंद्राने नव्या विक्रमाला गवसणी घातल्याचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी सांगितले.

Web Title: A new high of Parsa power plant in power generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.