नवीन ज्वारीची खरेदी १ नोव्हेंबरपासून!

By admin | Published: October 28, 2016 02:57 AM2016-10-28T02:57:11+5:302016-10-28T02:57:11+5:30

धान आणि ज्वारीची हमी दराने खरेदी शासनामार्फत १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार.

New jowar purchase from 1st November! | नवीन ज्वारीची खरेदी १ नोव्हेंबरपासून!

नवीन ज्वारीची खरेदी १ नोव्हेंबरपासून!

Next

संतोष येलकर
अकोला, दि. २७- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामातील धान आणि ज्वारीची हमी दराने खरेदी शासनामार्फत १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी खरेदी करण्यात आलेली ज्वारी शासनाच्या आदेशाअभावी राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अद्याप पडलेली असतानाच, नवीन ज्वारी खरेदी सुरू करण्यात येत आहे हे विशेष.
सन २0१६-१७ यावर्षीच्या खरीप हंगामात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान आणि ज्वारी तसेच बाजरी व मका या भरड धान्याच्या किमान आधारभूत किमती शासनामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान, ज्वारी, बाजरी व मका या भरड धान्याची खरेदी सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला.

असे राहतील हमी दर!
शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार एफएक्यू दर्जाच्या सर्वसाधारण धानाची प्रतिक्विंटल १ हजार ४७0 रुपये, ह्यअह्ण दर्जाच्या धानाची प्रतिक्विंटल १ हजार ५१0 रुपये, संकरित ज्वारी प्रतिक्विंटल १ हजार ६२५ रुपये, मालदांडी ज्वारी प्रतिक्विंटल १ हजार ६५0 रुपये, बाजरी प्रतिक्विंटल १ हजार ३३0 रुपये व मका प्रतिक्विंटल १ हजार ३६५ रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे.

Web Title: New jowar purchase from 1st November!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.