बालहक्क संरक्षणासाठी नवे ‘चिराग’ अॅप
By Admin | Published: November 10, 2016 05:41 AM2016-11-10T05:41:23+5:302016-11-10T05:41:23+5:30
बाल हक्क आयोगाचे कार्य आणि बालकांच्या हक्काची जाणीव या माहितीसह बालकांवर होणाऱ्या अन्याय
मुंबई : बाल हक्क आयोगाचे कार्य आणि बालकांच्या हक्काची जाणीव या माहितीसह बालकांवर
होणाऱ्या अन्याय, अत्याचारांची थेट तक्रार करण्यासाठी वापरता येणाऱ्या ‘चिराग’ या मोबाइल अॅपचे
उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे
यांच्या हस्ते आज झाले.
या वेळी आयोगाचे सचिव ए.एन. त्रिपाठी आदी उपस्थित होते. असे अॅप सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
‘स्मार्ट ग्राम’ विजेत्यांना ४२ कोटींची बक्षिसे
ग्रामविकास विभागाच्या स्मार्ट ग्राम योजनेतील विजेत्या गावांना दरवर्षी ४२ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. त्याव्यतिरिक्त या योजनेवर स्वत: शासन यंदा ५४ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज पत्र परिषदेत सांगितले. (विशेष प्रतिनिधी)