डान्सबार बंदीसाठी नव्याने कायदा
By admin | Published: December 24, 2015 02:22 AM2015-12-24T02:22:20+5:302015-12-24T02:22:20+5:30
डान्स बार बंदीसाठी नव्याने कायदा तयार करून एकमताने मंजूर केला जाईल. यासाठी महाधिवक्ता यांच्याकडे अभिप्राय मागितला आहे
नागपूर : डान्स बार बंदीसाठी नव्याने कायदा तयार करून एकमताने मंजूर केला जाईल. यासाठी महाधिवक्ता यांच्याकडे अभिप्राय मागितला आहे. पण या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची संपूर्ण अंमलबजावणी केली जाईल. कायदा तयार होईपर्यंत १८ अटी-शर्तींवर डान्सबारला परवानगी दिली जाईल. खोलीत सीसीटीव्ही लावणार असून सर्व्हर पोलीस ठाण्याशी जोडलेला असेल. तेथे होणारा डान्स पोलीस ठाण्यात लाईव्ह दिसेल. या अटींची पूर्तता न करणारे ३४ अर्ज मुंबई पोलिसांनी नाकारल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, भ्रष्टाचाराविरुद्धच्या चौकशांमध्ये तुरुंगात जावे लागू नये म्हणून यांना भीती वाटते. त्यामुळेच मी गृहमंत्रालय सोडावे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. ही मागणी स्वत:च्या बचावासाठी आहे, अशी टीका करीत मी फुलटाईम गृहमंत्री आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.